औरंगाबाद- कांचनवाडी- सातारा रस्त्यावरील रिव्हरडेल शाळेजवळ दुचाकीवरील जात असलेल्या महिलेचे पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावल्याची घटना घडली. कार्तिकी संभाजी गरड (वय २१) असे त्या महिलेचे नाव असून या प्रकरणी दोन अज्ञात चोरांविरोधात सातार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दुचाकीस्वार महिलेचे गंठण हिसकावले; मंगळसूत्र चोरीचे सत्र सुरूच - महिलेचे मंगळसूत्र चोरी न्यूज
तक्रारीनंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केली. मात्र, अद्यापही चोरट्यांचा शोध लागला नाही.
अद्याप चोरांचा शोध नाही
कार्तिकी काही दिवसांपूर्वीच शहरात आल्या होत्या. त्या आपली मुलगी, आई व भाऊ यांच्यासोबत दुचाकीवरुन खंडोबा मंदिराकडे जात होत्या. यावेळी पाठीमागून काळ्या रंगाच्या दु्ाचाकीवर आलेल्या दोघांनी कार्तिकी यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावले. या घटनेनंतर कार्तिकी यांनी सातारा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केली. मात्र, अद्यापही चोरट्यांचा शोध लागला नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर शिरसाट करत आहेत.