महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या गटनेत्याचा आम्हाला पाठिंबा, आम्ही स्थिर सरकार देऊ - दानवे - रावसाहेब दानवे

आम्ही राष्ट्रवादी फोडलेली नाही, पुढील पाच वर्षे स्थिर सरकार आम्ही देऊ, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. राष्ट्रवादी पक्षात अनेक पक्षातून आलेले लोक आहेत. त्यातील एका गटाने आम्हाला पाठिंबा दिला

रावसाहेब दानवे

By

Published : Nov 23, 2019, 11:56 AM IST

Updated : Nov 23, 2019, 12:23 PM IST

औरंगाबाद - राष्ट्रवादीच्या गटनेत्याने आम्हाला पाठिंबा दिला आहे. आज शिवसेनेसोबत गेल्यास भले होणार नाही, हे अजित पवार यांना माहीत होते. म्हणून भाजप सोबत जाण्याच्या निर्णयाला अजित पवार यांनी संमती दर्शवली असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा -महाराष्ट्रातील राजकीय 'भूकंपा'नंतर सोशल मीडियावर पाहा कोण काय म्हणाले...

आम्ही राष्ट्रवादी फोडलेली नाही, पुढील पाच वर्षे स्थिर सरकार आम्ही देऊ, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. राष्ट्रवादी पक्षात अनेक पक्षातून आलेले लोक आहेत. त्यातील एका गटाने आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्ही सरकार स्थापन केले. शरद पवार यांनी जरी याला माझा पाठिंबा नाही, असे म्हटले असले तरी त्यांनी नेमलेल्या गटनेत्याने पाठिंबा दिल्याने पक्षाने आम्हाला पाठिंबा दिल्यासारखे असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा

हेही वाचा -मी पुन्हा येईन....

राज्यात गेल्या महिन्याभरापासून सत्तास्थापन करण्यावरून सुरू असलेल्या राजकारणाचा वेगळा अध्याय आज पाहायला मिळाला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली होती. जनतेच्या हिताचे कुठलेच निर्णय होऊ शकत नव्हते. शिवसेनेने युती धर्म पाळला नाही. आम्ही कधीही शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचे आश्वासन दिले नव्हते. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर दबाव टाकण्यासाठी अफवा पसरवली होती. आम्ही कोणताही पक्ष फोडला नाही. जे आले त्यांच्या सोबत, जे नाही आले त्यांना सोडून आम्ही राज्यात स्थिर सरकार देऊ. 'मोदी है तो मुमकीन है' असे दानवे यांनी सांगितले.

Last Updated : Nov 23, 2019, 12:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details