महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काकाच्या वाढदिवसाला भाजपचे पदाधिकारी उपस्थित, मात्र भाजपात प्रवेश केलेला पुतण्या हजर नसल्याचीच चर्चा अधिक - NCP

भाऊसाहेब चिकटगावकरांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. तसेच भाजपचेही काही पदाधिकारी उपस्थित होते, मात्र नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले त्यांचे पुतणे अभय पाटील काकांना शुभेच्छा देण्यासाठी हजर नसल्याने त्यांच्या गैरहाजेरीची चर्चा होती.

Bhausaheb Chikatgaonkar
राष्ट्रवादी काँग्रसचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकरांचा ६१वा वाढदिवस साजरा

By

Published : Mar 18, 2022, 9:59 AM IST

Updated : Mar 18, 2022, 10:42 AM IST

वैजापूर (औरंगाबाद)- काका-पुतण्याचे राजकारण महाराष्ट्रासाठी नवीन नाही. मग ते ठाकरे कुटुंब असेल किंवा मुंडे वा, पवार. बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहून राज ठाकरेंचे (Balasaheb Thackeray and Raj Thackeray ) नेतृत्व बहरलेले महाराष्ट्राने पाहिले आणि नंतर राज यांनी स्वतःची वेगळी 'सेना' उभी केली तर मराठवाड्यातील गोपीनाथ मुंडे यांच्या मुशीत धनंजय मुंडेंची ( Gopinath Munde and Dhananjay Munde ) राजकीय कारकिर्द घडली आणि नंतर त्यांनी राष्ट्रवादीचा मार्ग निवडला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्येही गेल्या काही दिवसांपासून काका-पुतण्याच्या राजकारणाची अर्थात माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर ( Former MLA of NCP Bhausaheb Chikatgaonkar ) आणि त्यांचे पुतणे अभय पाटील चिकटगावकर ( Abhay Patil ) यांची चर्चा सुरु आहे.

मागील महिन्यात अभय पाटील चिकटगावकर यांनी राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. यामुळे भाऊसाहेबांचा आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. गुरुवारी भाऊसाहेब चिकटगावकरांचा वाढदिवस होता. या एकसष्टीच्या निमित्ताने त्यांनी तालुक्यात शक्तीप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. मात्र येथे चर्चा होती ती पुतण्याच्या भाजप प्रवेशाने भाऊसाहेब पाटलांच्या गोटात निर्माण झालेल्या उत्साहाची.

भाऊसाहेब चिकटगावकरांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. तसेच भाजपचेही काही पदाधिकारी उपस्थित होते, मात्र नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले त्यांचे पुतणे अभय पाटील काकांना शुभेच्छा देण्यासाठी हजर नसल्याने त्यांच्या गैरहाजेरीची चर्चा होती.

अभय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे

काका-पुतण्यातील राजकारण

भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी २०१४ च्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. २०१९ मध्ये मात्र त्यांचा पुतण्या अभय पाटील यांनी काकाविरोधात दंड थोपडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली. पुतण्याला संधी देत काकांनी त्यावेळी माघार घेतली होती. मात्र अभय पाटील यांचा पराभव झाला. दरम्यानच्या काळात काका-पुतण्यामध्ये पुन्हा वाद झाल्याची चर्चा सुरु झाली आणि अभय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुतण्या भाजपमध्ये गेल्यामुळे भाऊसाहेबांना आता पक्षांतर्गत कोणी विरोधक राहिला नाही. त्यामुळे वैजापूर राष्ट्रवादी काँग्रेससाठी भाऊसाहेब चिकटगावकर हे एकमेव नेते राहिले आहेत. त्यामुळे गुरुवारी झालेला अभिष्टचिंतन सोहळा हा वाढदिवस कमी आणि राजकीय शक्तीप्रदर्शन जास्त असल्याची चर्चा तालुक्यात आहे.

हेही वाचा : MLA Ramesh Boranare : शिवसेना आमदारावर विनयभंग प्रकरणात गुन्हा; शिवसैनिक उतरले रस्त्यावर

Last Updated : Mar 18, 2022, 10:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details