महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विनाकरण फिरणाऱ्या 9 जणां विरुद्ध कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Aurangabad police news

अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरणाऱ्यांच्या विरोधात कन्नड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आदेशाचे उल्लंघन करुन शहरातील पिशोर नाका, शनिमंदिर, सिद्धिक चौक या भागात फिरणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली.

case-registered-against-kandar-police-station-how-moving-in-without-cause
विनाकरण फिरणाऱ्या 9 जना विरुद्ध कन्नड़ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By

Published : Mar 28, 2020, 8:44 PM IST

औरंगाबाद - अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न फिरण्याचे आदेश दिले असताना शहरात फिरणाऱ्या तसेच सामाजिक अंतर ( सोशल डिस्टन्स ) न ठेवणाऱ्या 9 जणांविरुद्ध कन्नड़ शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कन्नड़ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी सांगितले, की कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार नागरिकांनी घराबाहेर न पडता घरी राहणे अपेक्षित आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडल्यास योग्य सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे.

विनाकरण फिरणाऱ्या 9 जणाविरुद्ध कन्न शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या आदेशाचे उल्लंघन करुन शहरातील पिशोर नाका, शनिमंदिर, सिद्धिक चौक या भागात विनाकारण फिरणाऱ्या व सामाजिक अंतर न ठेवणाऱ्याविरुध् कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करुन अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये व 6 अंतर पाळावे, असे आवाहनही त्यांनी केले. पोलिसांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणाऱ्यामधे दहशत निर्माण झाली आहे. यापुढेही करवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details