औरंगाबाद -सातारा परिसरातील दोन कोटी रुपयांच्या कामाची रस्त्याची निविदा परत घेण्यावरून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ, उप-महापौर राजेंद्र जंजाळसह सहा जणांनी शिवसेना शहर संघटक सुशील खेडकर यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी रविवारी वेदांतनगर पोलीस ठाण्यात आमदार शिरसाठ, उपमहापौर जंजाळ यांच्यासह ६ जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार संजय शिरसाठ व उपमहापौर जंजाळने शिवसेनेच्या ठेकेदारास बदडले, गुन्हा दाखल - Aurangabad Police News
औरंगाबादच्या सातारा परिसरातील दोन कोटी रुपयांच्या कामाची निवीदा परत घेण्यावरून शिवसेना आमदार संजय शिरसाठ, उप महापौर राजेंद्र जंजाळसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधीक तपास वेदांतगर पोलीस करत आहेत.
शिवसेनेचे औरंगाबादचे शहर संघटक तथा कंत्राटदार सुशील खेडकर यांनी सातारा परिसरातील रस्त्याची दोन कोटी रुपयांची निविदा भरली होती. या निविदा संदर्भात शनिवारी सामदार संजय शिरसाठ यांनी खेडकर यांना फोन करून त्यांच्या कोकनवाडी येथील कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यावेळी निविदा मागे घेण्यावरून आमदार संजय शिरसाठ व खेडकर यांच्यात वादावादी झाली. आमदार शिरसाठ व उप महापौर राजेंद्र जंजाळ यांनी खेडकर यांना मारहाण केली. या वेळी तेथे उपस्थित राजू राजपूत, अनिल बिरारे, निलेश नरवडे व पैठणे या चौघांनी देखील खेडकर व त्यांच्या मित्रांला बेदम मारहाण केली. या मारहाणीत खेडकर यांचे डोके फुटले तर त्यांचा मित्र जखमी झाला. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी पोलिसांनी खेडकर यांचा जबाब घेऊन आमदार शिरसाठ, उप-महापौर जंजाळांसह सहा जणांवर वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.