औरंगाबाद- खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिसात जलील यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंद काळात सील केलेले दुकान उघडण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांसोबत क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गेले होते.
खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल महिला पोलीस कर्मचऱ्याशी गैरवर्तनमंगळवारी खासदार इम्तियाज जलील कारवाई झालेल्या व्यापाऱ्यांना सोबत घेऊन कामगार उपायुक्त कार्यालयात गेले. त्यावेळी पोलीस निरीक्षक तिथे जात असताना महिला पोलीस कर्मचारी मोबाईल चित्रीकरण करत होती. ही बाब खासदार जलील यांच्या लक्षात येताच त्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला धक्का मारत मोबाईल पाडण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर बाहेर उभं राहण्याचा दम दिला. या घटनेची नोंद घेण्यात आली होती.
उपायुक्तांना वापरली एकेरी भाषाशहरातील सील केलेल्या 66 दुकानांचे सील काढण्याच्या मागणीसाठी 24 व्यावसायिकांना घेऊन खासदार इम्तियाज जलील कामगार उपायुक्त शलेंद्र पोळ यांच्या दालनात दाखल झाले. त्यावेळी खासदार जलील यांनी पोळ यांना बोलताना गैरवर्तन करत एकेरी भाषा वापरली. "व्यापाऱ्यांना दुकान उघडण्यासाठी परवानगी दे, त्यांना काय दंड लावणार आताच सांग" असे शब्द जलील यांनी वापरले. याप्रकरणी उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या तक्रारीवरून क्रांतिचौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 353, 332, 188, 269 प्रमाणे खासदार जलील यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.