महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत तब्बल दीड लाखांच्या प्लास्टिक बॅगा जप्त, व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल - Crimes filed against traders

महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दीड लाख रुपयांचा कॅरिबॅगसाठा जप्त केला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादेत तब्बल दीड लाखांचा कॅरिबॅगसाठा जप्त
औरंगाबादेत तब्बल दीड लाखांचा कॅरिबॅगसाठा जप्त

By

Published : Feb 7, 2021, 5:38 PM IST

औरंगाबाद - शहरात आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कॅरिबॅग संदर्भात मोठी कारवाई केली. यावेळी तब्बल दीड लाख रुपयांचा दोन हजार 190 किलो कॅरिबॅगसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी व्यापाऱ्यांवर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेची कारवाई..

महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक बंडूशेषराव साबळे यांनी मिलकॉर्नर ते दिल्लीगेट दरम्यान पेट्रोलिंग करताना वाहनाची तपासणी केली. तेव्हा या वाहनात प्लास्टिक आढळून आले. यावेळी चालक रामेशर खाजेकर याला विचारपूस केली तर त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर स्वच्छता निरीक्षकांनी वाहनातील मुद्देमाल ताब्यात घेतला. यात गांगवाल प्लास्टिक, चांदीवाल प्लास्टिक, जैन प्लास्टिक, श्री गणेश इंडस्ट्रीज यांच्या कंपनीचे एकूण 66 पिशव्यांचे बॉक्स ज्यांची किंमत एक लाख 52 हजार 844 रुपये आहे. तसेच महिंद्रा पिकअप वाहन असा एकूण चार लाख 52 हजार 844 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय कारवाई करताना शालिमार प्लास्टिकचे मालक नाजीम यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून अडथडा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details