महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद जळीतकांड : शवविच्छेदनानंतर पीडितेचा मृतदेह मूळ गावी रवाना - शवविच्छेदनानंतर पीडितेचा मृतदेह मूळ गावी रवाना

औरंगाबाद जिल्ह्यातील अंधारी गावांमध्ये 4 फेब्रुवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास शरीरसुखाची मागणी करत एका महिलेला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती.

Aurangabad
औरंगाबाद जळीतकांड

By

Published : Feb 6, 2020, 1:34 PM IST

औरंगाबाद- जिल्ह्यातील अंधारी गावात महिलेकडे केलेली शरीर सुखाची मागणी धुडकावल्याने वासनांध आरोपीने महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळले होते. त्या पीडितेचा उपचारा दरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. या पीडितेवर शवविच्छेदन करून मृतदेह पोलीस बंदोबस्तात औरंगाबादहून मूळगावी रवाना करण्यात आला आहे.

शवविच्छेदनानंतर पीडितेचा मृतदेह मूळ गावी रवाना

हेही वाचा - 'ती'ची मृत्यूशी झुंज अपयशी; आरोपीलाही जाळण्याची नातवाईकांची मागणी

औरंगाबाद जिल्ह्यातील अंधारी गावांमध्ये 4 फेब्रुवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास शरीरसुखाची मागणी करत एका महिलेला जिवंत झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्या महिलेचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये असलेल्या शवचिकित्सा केंद्रांमध्ये त्या महिलेवर शवविच्छेदन करण्यात आले.

पीडित महिलेचा मृत्यू झाल्याचे कळताच अनेक नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात गर्दी केली होती. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामीण पोलीस तसेच बेगमपुरा पोलीस रुग्णालयात ठाण मांडून होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन करून पीडितेचा मृतदेह पोलीस बंदोबस्तात अंधारी गावी रवाना करण्यात आला.

हेही वाचा -औरंगाबाद : सिल्लोड जळीतकांडातील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details