महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ती'ची मृत्यूशी झुंज अपयशी; आरोपीलाही जाळण्याची नातवाईकांची मागणी - Burnt woman dies

घरात घुसून एका महिलेला पेटवण्यात आलेल्या महिलेचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेच्या नातेवाईकांनी आरोपीलाही पीडितेप्रमाणे जाळण्यात यावे, अशी मगाणी केली आहे.

Aurangabad
आरोपीलाही जाळण्याची नातवाईकांची मागणी

By

Published : Feb 6, 2020, 10:18 AM IST

औरंगाबाद- घरात घुसून एका महिलेला पेटवण्यात आलं होतं. 95 टक्के भाजलेल्या या महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी संध्याकाळी या महिलेनं अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी ज्याप्रमाणे पीडितेला जाळण्यात आले त्याप्रमाणेच आरोपीलाही जाळा, अशी मागणी केली आहे. तसेच मुलीच्या शिक्षणाचा खर्च सरकारने करावा, अशी मागणी केली आहे.

आरोपीलाही जाळण्याची नातवाईकांची मागणी

हेही वाचा -औरंगाबाद : सिल्लोड जळीतकांडातील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातील अंधारी गावांमध्ये रात्री साडेअकराच्या सुमारास शरीरसुखाची मागणी करत एका महिलेला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या महिलेचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवचिकित्सा केंद्रांमध्ये या महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.

महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाइकांकडून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. पीडितेची मुलगी ही विज्ञान शाखेत बारावीमध्ये शिकत आहे. तिच्या शिक्षणाचा भार शासनाने उचलावा. त्याचबरोबर पीडितेच्या मुलीला सरकारी नोकरीत समावून घ्यावे, अशी मागणी नातेवाइकांकडून होत आहे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे आमच्या मुलीला जाळण्यात आले, त्याचप्रमाणे आरोपीला देखील जिवंत जाळण्याची शिक्षा देण्यात यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली आहे.

हेही वाचा -सोशल मीडिया आणि यांत्रिकीकरणामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल - मानसोपचार तज्ञ

ABOUT THE AUTHOR

...view details