औरंगाबादमार्गे नागपूरला जाणार बुलेट ट्रेन? चाचपणीला सुरुवात - बुलेट ट्रेन औरंगाबाद
प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गाचे सर्वेक्षण 2018 मध्ये स्पेनच्या इन्फो कंपनीने केले होते. मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती आणि नागपूर या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यासंबंधीचा अहवालही रेल्वे विभागाकडे सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पात सहा मार्गांचा समावेश असून त्यामध्ये महाराष्ट्रातून दोन मार्गांचा समावेश आहे.
औरंगाबाद- राज्यासह देशात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प मोदी सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प मानला जातो. त्याच बरोबर आता राज्यात आणखी दोन नवीन बुलेट ट्रेन मार्गांची चाचपणी केली जात आहे. ज्यामध्ये मुंबई-औरंगाबादमार्गे-नागपूर तर दुसरा मुंबई-पुणे-हैद्राबाद या मार्गांचा समावेश आहे. या प्रकल्पाबाबत सध्या चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गाचे सर्वेक्षण 2018 मध्ये स्पेनच्या इन्फो कंपनीने केले होते. मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती आणि नागपूर या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यासंबंधिचा अहवालही रेल्वे विभागाकडे सोपवण्यात आल्याचे बोलल जात आहे. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पात सहा मार्गांचा समावेश असून त्यामधे महाराष्ट्रातून दोन मार्गांचा समावेश आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सोबत राज्यात दोन नवीन मार्गांची चाचपणी सुरू असल्याचे समोर आले आहे. त्याबाबत रेल्वे विभागाकडून चाचपणी करून नवीन मार्गांवर बुलेट ट्रेन सुरू करणे शक्य आहे का? याबाबत आपला अहवाल तयार करत आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन ही समृद्धी महामार्गाच्या समांतर बाजूने घेऊन जाणे शक्य होईल का? याबाबत ही विशेष चाचपणी सुरू आहे. तर नागपूरला जाणारी बुलेट ट्रेन औरंगाबाद मार्गे जाणार आहे. बुलेट ट्रेन धावताना अनेक ठिकाणी पुलांचा वापर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.