औरंगाबाद- सेल्फी काढताना सावधान राहण्याचा इशारा अनेक वेळा दिला जातो. मात्र, त्यानंतर देखील सेल्फीच्या नादात युवकाचा जीव गेल्याची घटना औरंगाबादच्या गौताळा अभयारण्यात समोर आली आहे. अविनाश पवार असे या 18 वर्षाच्या युवकाचे नाव असून पाण्यात पडल्यावर एक दिवसाने त्याचा मृतदेह आढळून आला.
गौताळा अभयारण्यातील धारेश्वर धबधब्यात सेल्फी काढताना पडल्याने युवकाचा मृत्यू - kannad
अविनाश पवार असे या 18 वर्षाच्या युवकाचे नाव असून पाण्यात पडल्यावर एक दिवसाने त्याचा मृतदेह आढळून आला. अविनाश कन्नड तालुक्यातील वाकी येथील राहणारा आहे.
अविनाश पवार हा आपल्या मित्रांसोबत सोमवारी गौताळा अभयारण्याच्या कुशीत असलेला धारेश्वर धबधबा पाहण्यासाठी गेला होता. धबधब्याचा आनंद घेत असताना तो दगडावरून सेल्फी काढत होता, त्याचवेळी त्याचा पाय घसरून खाली पडला. मित्रांसोबत असताना तो सेल्फी काढण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर ही घटना घडली.
अविनाश कन्नड तालुक्यातील वाकी येथील राहणारा आहे. धबधब्याच्या ठिकाणी मोठी गर्दी होती. त्यामुळे तो पडल्यानंतर कुणाच्याही लक्षात आले नाही. पडल्यानंतर एका दगडाच्या फटीत त्याचा मृतदेह अडकला होता. त्यामुळे कुणाच्याही लक्षात आले नाही. मित्रांनी शोध घेतल्यानंतर तो आढळून आला नव्हता. मात्र, आज सकाळी धबधब्याच्या खाली त्याचा मृतदेह आढळून आला.