औरंगाबाद : झटपट पैसे मिळविण्यासाठी चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. याशिवाय चोरीचे सोने विकत घेणाऱ्यालाही वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर पोलिसांनी वाळूज एमआयडीसी परिसरातील मंगळसूत्र चोरी प्रकरणी रामदास दिलीप बनकर आणि अंकुश भगवान वजीर या दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोघांचीही कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणांहून मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. एका महिलेचे मंगळसूत्र चोरी करताना दोघेही सीसीटीव्हीत कैद झाले होते. चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
सातारा, जवाहरनगर, सिडकोत केल्या चोऱ्या
बजाजनगर परिसरातील अश्विनी काकडे या स्कुटीस्वार महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र २१ जानेवारीला या दोघांनी लांबविले होते. याशिवाय सातारा, जवाहरनगर, सिडको आदी ठिकाणीही या दोघांनी मंगळसूत्र लांबविल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तसेच चोरी केलेले दागिने खरेदी करणारा काकासाहेब लक्ष्मण मांगे यालाही अटक करण्यात आली आहे.
झटपट पैसे मिळविण्यासाठी चोरी करणारे दोघे जेरबंद
या दोघांचीही कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणांहून मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. एका महिलेचे मंगळसूत्र चोरी करताना दोघेही सीसीटीव्हीत कैद झाले होते. चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
झटपट पैसे मिळविण्यासाठी चोरी करणारे दोघे जेरबंद