महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'डायमंड कप इंडिया-2019' बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मराठमोळ्या हर्षदाने पटकावले सुवर्णपदक - औरंगाबाद बॉडी बिल्डिंग स्पर्धा हर्षदाने पटकावले सुवर्णपदक

'डायमंड कप इंडिया-2019' ही आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रत्नागिरीच्या हर्षदा पाटील या मराठमोळ्या तरुणीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला सुवर्णपदक प्रदान करून दिले. पाहिल्या दिवशी भारतीय महिलांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत आपली प्रतिभा पाहायला मिळाली.

बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मराठमोळ्या हर्षदाने पटकावले सुवर्णपदक

By

Published : Nov 17, 2019, 10:12 AM IST

औरंगाबाद - 'डायमंड कप इंडिया-2019' ही आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रत्नागिरीच्या हर्षदा पाटील या मराठमोळ्या तरुणीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला सुवर्णपदक प्रदान करून दिले. पाहिल्या दिवशी भारतीय महिलांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत आपली प्रतिभा पाहायला मिळाली.

बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मराठमोळ्या हर्षदाने पटकावले सुवर्णपदक

हेही वाचा - शेवटी 'तो' विक्रम मोडित निघाला !

इंडियन बॉडी बिल्डींग अँड फिटनेस फेडरेशनच्यावतीने 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान औरंगाबाद येथे 'डायमंड कप इंडिया-2019' ही आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादचे माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. स्पर्धेसाठी जगभरातील 45 देशांतील 400 पेक्षा अधिक खेळाडूंची नोंदणी झाली आहे. औरंगाबादच्या विभागीय क्रिंडा संकुलाच्या मैदानावर मराठमोळ्या पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या स्पर्धेसाठी शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांसह आंतरराष्ट्रीय पंचाचा समावेश आहे.

पहिल्या दिवशी वुमन फिजिक आणि वुमन बिकनी राउंडने स्पर्धा सुरुवात झाली. महिलांच्या बिकनी प्रकारात विदेशी खेळाडू ताहितच्या अलेना लोपेजने शानदार प्रर्दशन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. केनियाच्या मिखायला पारेस सेलेस्टिनाने रौप्यपदक जिंकले. इंग्लंडच्या मँगलॉरेझने कांस्यपदक मिळवले. तर वुमन फिजिक प्रकारात महाराष्ट्राच्या हर्षदा पाटीलने पहिल्याच स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.

महिलांनी या स्पर्धांकडे वळावे त्यांच्या कुटुंबीयांनी देखील त्यानाा साथ द्यावी. बाहेरच्या देशातील महिला अपल्या देशात येऊन आपली प्रतिभा दाखवतात. आपल्या देशातील महिलांनी आपली प्रतिभा दाखवण्याची गरज असल्याचे मत हर्षदा पाटीलने व्यक्त केले. रविवारी जगातला सर्वोत्कृष्ट बॉडी बिल्डर निवडला जाणार असल्याची माहिती इंडियन बॉडी बिल्डींग अँड फिटनेस फेडरेशन व एशियन फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिटनेसेच सरचिटणीस डॉ. संजय मोरे यांनी दिली.

हेही वाचा - Hong Kong Open : उपांत्य फेरीत श्रीकांतचा पराभव, भारताचे आव्हान संपुष्टात

ABOUT THE AUTHOR

...view details