महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये युतीचा निर्णय होण्याआधी भाजपची तयारी पूर्ण - imtiyaj jalil news

शिवसेनेच्या मतदार संघात मेळावा घेत भाजपने औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघावर अप्रत्यक्ष दावा केला आहे. 2014 च्या निवडणुकीत सेना भाजपच्या वादात एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते.

औरंगाबादमध्ये युतीचा निर्णय होण्याआधी भाजपची तयारी पूर्ण

By

Published : Sep 20, 2019, 9:46 PM IST

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत युतीचा निर्णय तळ्यात मळ्यात असताना दुसरीकडे औरंगाबादेत भाजपच्या नेत्यांनी सर्व मतदार संघांमध्ये आपली तयारी असल्याचे संकेत दिले आहेत.

औरंगाबादमध्ये युतीचा निर्णय होण्याआधी भाजपची तयारी पूर्ण

हे ही वाचा -अशोक चव्हाणांना विरोधक पकडणार कोंडीत...भोकरमधील भाजपच्या हालचाली वाढल्या

औरंगाबाद मध्य हा विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा मानला जातो. 2014 च्या निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल तर भाजपकडून किशनचंद तनवाणी यांनी निवडणूक लढवली होती. जैस्वाल यांना तनवाणी यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली होती. याआधी युतीमध्ये ही जागा सेनेकडे असली तरी भाजपने या मतदार संघात आपली ताकद वाढल्याचा दावा केला आहे. इतकेच नाही तर आपली ताकद दाखवण्यासाठी भाजपने बुथ मेळावा घेत सेनेला धक्का देण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा -काँग्रेसचा मास्टरप्लान ! त्यामुळे पक्ष राज्यात पुन्हा मारणार मुसंडी?

मागील तीन वर्षांपासून भाजप औरंगाबादेत सर्वच जागांवर आपली तयारी करत असल्याचा दावा स्थानिक नेत्यांनी केला आहे. भाजपने लोकसभेसाठी निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, लोकसभेत युती झाली आणि ही जागा शिवसेनेला गेली. त्यावेळी भाजपने आपली यंत्रणा शिवसेनेच्या मागे उभी करून उमेदवार निवडून देण्याचा प्रयत्न केला. आता विधानसभा निवडणूक आहेत. त्यामुळे युती होईल ना होईल आपण सर्वच मतदार संघांमध्ये आपली तयारी पूर्ण केली असून प्रत्येक घरापर्यंत भाजप पदाधिकारी पोहचला असल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले आहे. शिवसेनेच्या मतदार संघात मेळावा घेत भाजपने औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघावर अप्रत्यक्ष दावा केला आहे. 2014 च्या निवडणुकीत सेना - भाजपच्या वादात एमआयएम चे इम्तियाज जलील निवडून आले होते. त्यामुळे आता सेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी आपली ताकद वाढल्याचा दावा केला असला तरी युती होईल का? आणि युती झाली तर ही जागा कोणाला सुटेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा -धुळ्याच्या राजकारणात अनिल गोटेंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही

ABOUT THE AUTHOR

...view details