महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत भाजपा पदाधिकाऱ्याची महिलेस मारहाण; भाजपा-शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने - औरंगाबाद न्यूज

भाजपाच्या पदाधिकाऱ्याने घराजवळ राहणाऱ्या एका महिलेस शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना न्यू हनुमान नगरात घडली होती. याप्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच मंगळवारी (दि.३१) दुपारी भाजप व शिवसेना कार्यकर्ते पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आमने-सामने आले होते.

भाजपा-शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने
भाजपा-शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने

By

Published : Sep 3, 2021, 9:21 AM IST

औरंंगाबाद - भाजपाच्या पदाधिकाऱ्याने घराजवळ राहणाऱ्या एका महिलेस शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना न्यू हनुमान नगरात घडली होती. याप्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच मंगळवारी (दि.३१) दुपारी भाजप व शिवसेना कार्यकर्ते पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आमने-सामने आले होते.

पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात भाजपा-शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने

पत्नीकडून शिवीगाळ -

न्यू हनुमान नगर, गल्ली नं. २ येथे परिवारासह घर भाड्याने घेऊन राहणाऱ्या महिलेला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय जनता पक्षाचा जिल्हा सचिव अशोक दामले आणि त्यांच्या पत्नीविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, २९ ऑगस्ट (रविवार) रोजी पीडिता सकाळी पावणे सातच्या सुमारास घरासमोर झाडू मारत होत्या. त्यावेळी त्यांच्या घरासमोर राहणारे भाजपा पदाधिकारी अशोक दामले यांंच्या पत्नी देखील त्यांच्या अंगणात झाडू मारत होत्या. यावेळी दामलेच्या पत्नीने पिडीतेला उद्देशून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यामुळे पिडीतेने तुम्ही मला असे का म्हणता, तुमचा माझा काय संबंध आहे, तुम्ही माझे नाव का खराब करताय? तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा स्वत:चा नवरा काय करतो ते बघा असे म्हटले.

स्टीलच्या रॉडने मारहाण-

त्यानंतर दामलेच्या पत्नीने आवाज देऊन घरात असलेल्या अशोक दामले यांना बाहेर बोलवले. दामले घरातून बाहेर येत असताना हातात स्टीलचा रॉड घेऊन बाहेर आले आणि ही बाई काय बोलतीये असे म्हणत अश्लील शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच हातातील स्टीलच्या रॉडने पिडीतेच्या उजव्या पायाच्या नगडीवर, हातावर, पाठीवर मारहाण करण्यास सुरूवात केली. यामुळे पीडितेला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. यानंतर पिडीता चक्कर येऊन खाली पडली. तसेच अशोक दामले यांनी अंगणात पडलेला दगड उचलून पिडीतेच्या डोक्यात मारून जखमी केले. यावेळी गल्लीत राहणाऱ्या नागरिकांनी मध्यस्ती करत पिडीतेला तिच्या घरात घेऊन गेले. पिडीतेने रक्तस्त्राव होत असल्याने घाटीत धाव घेतली. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून दामले दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details