वैजापूर (औरंगाबाद ): कालच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. शिवसेना आमदारांनी महिलेला मारहाण ( Shivsena MLA beats Woman ) केल्याचा गुन्हा देखील काल वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपच्या नेत्यांनी वैजापूरच्या शिवसेनेच्या आमदारांना निलंबित करण्याची मागणी केली ( BJP Demands To Suspend Shivsena MLA ) आहे.
आज भाजप महिला नेत्या वैजापूरमध्ये आक्रमक होतांना पाहायला मिळाल्या. हे प्रकरण गंभीर असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आमदाराला निलंबित केलं पाहिजे, अशा कडव्या भाषेत महिला आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात जाऊन उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यात अजून काही कलम वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.