औरंगाबाद- एका महिलेसोबत पंधरा वर्षे अन्याय करणारा व्यक्ती कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात कसा काय राहू शकतो, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवाय महिलांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या आवाज का उठवत नाहीत, असेही सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
शरद पवार गप्प का आहेत...?
करुणा मुंडे रविवारी (दि. 5 सप्टेंबर) परळीमध्ये दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडणार आहेत. यासंदर्भात त्यांनी काल फेसबूक लाईव्हवरून धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात करत पुराव्यासकट बोलणार असल्याची सांगितले होते. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'महाराष्ट्रामध्ये एका महिलेवर 15 वर्षे अन्याय करणारा व्यक्ती मंत्रिमंडळात राहूच कसा शकतो, धनंजय मुंडे यांनी निवडणूक लढवण्यासाठी शपथपत्र दिले होते, त्यात दोन बायकांचा उल्लेख केला होता का..? आता तेही समोर आले पाहिजे'. शरद पवार गप्प का आहेत, असा प्रश्न चांद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर आम्ही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, राज्यात गेंड्याची कातडी असलेले सरकार असल्याचा टोला पाटील यांनी लगावला.
संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी