महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमचे नेते हे देवेंद्र फडणवीसच - रावसाहेब दानवे - , बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी दिलेले सुत्र दोन्ही पक्षांनी पाळावे

शिवसेना आणि भाजप युतीचे जनक म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्याकडे पाहिले जाते. या नेत्यांनी घालून दिलेले सुत्र दोन्ही पक्षांनी मानावे आणि जनमताचा आदर करावा, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री  रावसाहेब दानवे यांनी केले. आमच्या नेतृत्वात कोणताही बदल होणार नसून आमचे नेते हे देवेंद्र फडणवीस हेच राहणार असल्याचेही दानवे म्हणाले.

रावसाहेब दानवे

By

Published : Nov 17, 2019, 9:01 PM IST

औरंगाबाद -शिवसेना आणि भाजप युतीचे जनक म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्याकडे पाहिले जाते. या नेत्यांनी घालून दिलेले सुत्र दोन्ही पक्षांनी मानावे आणि जनमताचा आदर करावा, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. तसेच आमच्या नेतृत्वात कोणताही बदल होणार नसून आमचे नेते हे देवेंद्र फडणवीस हेच राहणार असल्याचेही दानवे म्हणाले.

1995 मध्ये युतीला बहुमत मिळाले होते, त्यावेळी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे सूत्र या दोन्ही नेत्यांनी तयार केले होते. त्यावेळी मनोहर जोशी आणि नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले होते. तर भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद होते. हेच सूत्र घेऊन शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी चालावे आणि जनमताचा आदर करावा असे दानवे म्हणाले. ते औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

रावसाहेब दानवे

देवेंद्र फडणवीस हेच आमचे नेते

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्षमपणे सरकार चालवले आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक अडचणी आल्या मात्र, त्यांनी सक्षमपणे तोंड दिले. ते एक यशस्वी नेतृत्व आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस हेच राहणार आहेत, नेतृत्वात बदल होणार नसल्याचेही दानवे म्हणाले.

शिवसेना आणि भाजप युतीमध्ये मुख्यमंत्री पदाला घेऊन प्रचंड तणाव पाहायला मिळत आहे. दोघांची मने जुळत नसल्याने महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवटीला समोरे जावे लागत आहे. नेतृत्वासाठी तुम्ही पुढाकार घेणार का? असा दानवेंना प्रश्न विचारल्यावर मागील ५ वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्षमपणे युतीचे सरकार चालवले आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आमचे नेते फडणवीस राहणार आहेत. नेतृत्व कोणतेही बदल होणार नसल्याचे दानवे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details