सिल्लोड - सिल्लोड शहरातील सहायक निबंधक कार्यालयाच्या विरोधात नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी येत होत्या. याची दखल घेत आज सिल्लोड शहर भाजपतर्फे सहायक निबंधक चटलावार यांना धारेवर धरण्यात आले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष कमलेश कटारीया यांच्या सहित नगरसेवक मनोज मोरेल्लू, किरण पवार, बार कौंसिलचे अध्यक्ष अॅड अशोक तायडे, शहर कार्यकारिणीतील निमंत्रित सदस्य विष्णू काटकर, शहर सरचिटणीस मधुकर राऊत, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अरुण राठोड, शहर कोषाध्यक्ष प्रकाश भोजवानी गजानन माळकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराला नागरिक वैतागले-
सिल्लोड शहरासह १२८ खेड्यांचा कारभार शहरातील निबंधक कार्यालयात चालतो. वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे कामे खोळंबून पडतात. मागील आठवड्यात देखील तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस काम बंद होते. लोकांना सतत चकरा माराव्या लागतात. विशेष म्हणजे सिल्लोड शहरातील मालमत्ते संदर्भात खरेदी-विक्री दस्त नोंदणी होतांना नगरपरिषदेच्या नमुना नंबर ४३ ची मागणी करण्यात येते. मुळात नमुना नंबर ४३ हे केवळ कराचे प्रमाणपत्र आहे. त्यावरून कुठलाही मालकी हक्क सिद्ध होत नाही. असे असतांना देखील नागरिकांना नगरपरिषदेच्या चकरा व्हाव्या या हेतूने त्यांचा छळ चालू आहे. अगोदरच नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराला नागरिक वैतागले आहेत. दोन-दोन महिने चकरा मारून देखील लोकांना नमुना नंबर ४३ व झोन प्रमाणपत्र उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सर्व व्यवहार अडकून पडले आहेत.
अवैध प्लॉटिंगचा सुळसुळाट-