महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत पाणीप्रश्न पेटला, महापालिकेत सेना-भाजप आमने सामने - औरंगाबादेत पाणीप्रश्न पेटला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अनेक योजना स्थगित केल्या आहेत. त्यामध्ये औरंगाबादच्या 1680 कोटी रुपयांची योजना रद्द केल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक विजय औताडे यांनी आपल्या उपमहापौर पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पाणी योजना मंजूर होईपर्यंत शिवसेनेशी भाजपने असहकार करत महापालिकेत विरोधी भूमिका घेतली होती. पाण्यासाठी आंदोलन करत ४ महिन्यांनी असणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेनेवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

BJP agitated for water scheme in aurangabad municipality
महापालिकेत सेना-भाजप आमने सामने

By

Published : Dec 17, 2019, 3:25 PM IST

औरंगाबाद - शहरातील पाणी प्रश्नावरून महापालिकेत सेना-भाजप दोन्ही आमने सामने आले आहेत. पाणी योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. हातात फलक घेऊन रस्त्यावर रिकामी घागर ठेवत भाजप नगरसेवकांनी राज्य सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली.

महापालिकेत सेना-भाजप आमने सामने

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अनेक योजना स्थगित केल्या आहेत. त्यामध्ये औरंगाबादच्या 1680 कोटी रुपयांची योजना रद्द केल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक विजय औताडे यांनी आपल्या उपमहापौर पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पाणी योजना मंजूर होईपर्यंत शिवसेनेशी भाजपने असहकार करत महापालिकेत विरोधी भूमिका घेतली होती. पाण्यासाठी आंदोलन करत ४ महिन्यांनी असणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेनेवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

नेहमी सत्तेत शिवसेनेसोबत असलेली भाजप आज महापालिकेसमोर सेनेच्या विरोधात आंदोलन करताना दिसली. युती सरकारच्या काळात औरंगाबादसाठी राज्यसरकारने 1680 कोटींची पाणी योजना मंजूर केली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंजूर केलेल्या योजनेमुळे महापालिकेच्या निवडणुकीत फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, राज्य सरकारने पाणी योजनेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेत पाण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या विजय औताडे यांनी तडकाफडकी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पालिकेत मित्रपक्ष असलेल्या सेना भाजपमध्ये संघर्षाला सुरुवात झाली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत भाजपने पालिकेतील सर्व पदांचा राजीनामा देत सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. इतकेच नाही, तर पालिकेत शिवसेनेला असहकार करत विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याचा इशारा दिला. राज्य सरकारने अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने भाजपने आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

राज्यात सेनेची सत्ता असूनही शिवसेनेचे महापौर योजनेची स्थगिती उठवण्यास अकार्यक्षम असल्याने महापौर नंदकुमार घोडेले यांनी पदाचा राजीनामा देण्याची मागणी भाजपने केली होती. पाण्याच्या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर हातात फलक घेऊन रस्त्यावर रिकामी घागर ठेवत आंदोलन केले. स्थगित असलेली योजना पूर्ण करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details