औरंगाबाद- सिल्लोड शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील समस्या दूर न झाल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात डुकराची पिल्ले सोडून आंदोलन करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ३ मधील समतानगर, शिवाजीनगर, शिक्षक कॉलनी, छत्रपती शिवाजीनगर, वाघवाडी, सपकाळवाडी या परिसरात नगर परिषद निवडणुकीनंतर हेतू पुरस्सर नगर परिषदेमार्फत घंटागाडी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक घरातील कचरा आसपासच्या परिसरात टाकत असल्याने दुर्गंधी वाढली होती.
सिल्लोडमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात डुकराची पिल्ले सोडून आंदोलन त्यामुळे २४ तासाच्या आत हा परिसर कचरामुक्त न केल्यास परिसरातील डुक्कर पकडून नगर परिषद कार्यालयात सोडून आंदोलन करण्याचा इशारा भाजप नगरसेविका अश्विनी पवार व रुपाली मोरेल्लू यांनी मुख्याधिकाऱ्यांना मंगळवारी निवेदनाद्वारे दिला होता.
निवेदन देऊनही परिसरात स्वच्छता न झाल्याने किरण पवार, मनोज मोरेल्लू यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शुक्रवारी डुकरांची पिले सोडून आंदोलन करण्यात आले.