महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जि.प. सदस्याच्या उपस्थितीत कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा; कोरोना नियमांचे उल्लंघन - Virgaon grampanchayat

वैजापूर तालुक्यातील विरगाव येथील एका युवा कार्यकर्त्यांचा वाढदिवस अगदी थाटात साजरा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या वाढदिवसाला औरंगाबाद जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे व विरगाव ग्रामपंचायत चे सरपंच-उपसरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

नियमांचं उल्लंघन करून वाढदिवस साजरा
नियमांचं उल्लंघन करून वाढदिवस साजरा

By

Published : Apr 9, 2021, 6:53 PM IST

वैजापूर (औरंगाबाद) : राज्यासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. त्या मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड 19 संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चैन असा प्रतिबंधात्मक आदेश काढला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील असे सांगण्यात आले. या उलट वाढदिवस व इतर सार्वजनिक कार्यक्रम करण्यास शासनाची सक्त मनाई असताना, वैजापूर तालुक्यातील विरगाव येथील एका युवा कार्यकर्त्यांचा वाढदिवस अगदी थाटात साजरा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या वाढदिवसाला औरंगाबाद जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे व विरगाव ग्रामपंचायत चे सरपंच-उपसरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दीही दिसून आली.

गर्दी टाळणे हा शासनाचा मुख्य हेतू असतांना जिल्हा परिषद सदस्य व विरगाव सरपंच उपसरपंच सह ग्रामपंचयात सदस्य यांनी गर्दी केल्याचे दिसून आले. दररोज ग्रामपंचयात सदस्य यांच्या उपस्थिती मध्ये मार्केट बंद करण्याचे काम पोलिसां मार्फत केले जाते. मात्र आज पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषद सदस्या सह सरपंच-उपसरपंच व काही सदस्यांच्या उपस्थिती नियमाला हरताळ फासल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे या कार्यक्रमाला ठाणे प्रमुखांची अलिखित परवानगी होती का? आणि नसेल तर यांच्या वर काय कारवाई होते, हे पाहणे महत्वाचे असणार आहे..

ABOUT THE AUTHOR

...view details