औरंगाबाद - सिडको पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला. दोन दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या 19 दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. औरंगाबाद शहरातील विविध भागांमध्ये, गर्दीच्या ठिकाणांवरुन दुचाकी चोरून त्यावर खोटे नंबर लावून या गाड्या ग्रामीण भागात विकल्या जात होत्या.
दुचाकी चोरांचा पर्दाफाश, 19 दुचाकी जप्त
औरंगाबाद शहरातील विविध भागांमध्ये, गर्दीच्या ठिकाणांवरुन दुचाकी चोरून त्यांवर खोटे नंबर लावून या गाड्या ग्रामीण भागात विकल्या जात होत्या.
पोलिसांना सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिडको एम 2 भागात दोन व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याची माहिती होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी सिडको भागात फिरत असलेल्या नाजीम बने खाँ पठाण आणि विजय दिवटे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, ते या भागात दुचाकी चोरीसाठी आल्याचा कबुली जबाब त्यांनी दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी चोरीच्या 19 दुचाकी जप्त केल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी चोरीच्या वाहनांची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.