महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aurangabad Corporation : औरंगाबाद महानगरपालिकेत मोठा घोटाळा, खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप

एमआयएम प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियज जलील ( MIM State President Mr. Imtiaz Jalil ) यांनी केला आहे. 2017 ते 2020 या काळात एनवेळचे प्रस्ताव म्हणून महापौर आणि नगरसचिव यांनी मिळून हा घोटाळा केला. याबाबत न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाऊ असा इशारा खा. जलील यांनी दिला आहे. ( Aurangabad Municipal Corporation)

Mr. Imtiaz Jalil
खा. इम्तियज जलील

By

Published : Dec 6, 2022, 8:01 PM IST

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेत शंभर ते दीडशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप एमआयएम प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील ( MIM State President Mr. Imtiaz Jalil ) यांनी केला आहे. 2017 ते 2020 या काळात एनवेळचे प्रस्ताव म्हणून महापौर आणि नगरसचिव यांनी मिळून हा घोटाळा केला. याबाबत न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाऊ असा इशारा खा. जलील यांनी दिला आहे. इतकच नाही तर राज्यपाल भगतसिंह कोशारी ( Governor Bhagat Singh Koshari ) यांच्या विरोधात एमआयएम आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ( Aurangabad Municipal Corporation )

औरंगाबाद महानगर पालिकेत मोठा घोटाळा, खा इम्तियाज जलील यांचा आरोप

100 ते 150 कोटींचा घोटाळा :औरंगाबाद महानगरपालिकेत सध्या प्रशासक नियुक्त आहेत. मात्र याआधी 2017 ते 2020 या काळामध्ये ऐनवेळीचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात घेण्यात आले. जवळपास 220 असे प्रस्ताव घेण्यात आले असून, यामध्ये 100 ते 150 कोटींचा घोटाळ झाला आहे. महापौर आणि नगरसचिव बंद खोलीमध्ये बसून ऐनवेळीचे प्रस्ताव पास करत होते. याबाबत विभागीय आयुक्तांना तक्रार देण्यात आली होती. मात्र आठ महिने कुठलीही कारवाई झाली नव्हती. त्याबाबत स्मरणपत्र दिल्यावर आता मनपा आयुक्तांना एक पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार या प्रकरण तपासण्याचे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पक्षपाती चौकशी झाली पाहिजे इतकच नाही तर दोशींवर एफआयआर नोंदवला गेला पाहिजे. याआधी अकोला महानगरपालिकेत देखील अशाच पद्धतीने ऐन वेळच्या प्रस्ताव पास करात भ्रष्टाचार झाला होता. त्यावेळी एफआयआर नोंदण्यात आला आहे. अशीच कारवाई झाली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागू आमच्याकडे पुरावे आहेत असे खा. इम्तियाज जलील यांनी सांगितले.


राज्यपालांच्या विरोधात करणार आंदोलन :भाजप आणि राज्यपाल महाराजांचा अवमान करत आहे. याआधी सावित्रीबाई फुलेंबाबत जेव्हा राज्यपाल बोलले होते, त्यावेळेसच त्यांचा कडाडून विरोध केला असता तर आता ते बोलले नसते. आता सर्वांनी एकमतांनी राज्यपाल नको अशी भूमिका घेतली पाहिजे. आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आम्ही कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला नाही. मात्र दानवेंनी तो केला आहे. त्यामुळे भाजपला महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार उरलेला नाही. आता त्यांना ठरवायचे आहे की त्यांना महाराजांचा सन्मान ठेवायचा आहे की राज्यपालांचा. आमचा पक्ष राज्यपालांच्या विरोधात सात डिसेंबर रोजी आंदोलन करणार असून राज्यपाल पद कायमस्वरूपी काढून टाका अशी मागणी करणार असल्याचे खा. इम्तियाज जलील यांनी सांगितलं.



वंचित ची भूमिका खेद जनक :2019 च्या निवडणुकीमध्ये दलित आणि मुस्लिम एकत्र आले. आतापर्यंत आम्ही सत्तेपासून दूर होतो. मात्र आम्ही एकत्र आल्यावर सर्वांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. नैसर्गिक युती म्हणले तर दलित आणि मुस्लिम हे एकत्रित आले असते तर निर्णायक ठरके असते. या निर्णयाचा सर्वांना आनंद झाला असता. आम्ही युतीत केली मात्र काही कारणास्तव ती पुढे गेली नाही. प्रकाश आंबेडकर हे किंग मेकर म्हणून आम्ही उल्लेख करत होतो. मात्र त्यांचा पक्ष आहे त्यांनी निर्णय घ्यावा, मला हा निर्णय दुर्दैवी वाटतो असे मत खासदार यांच्या जलील यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details