औरंगाबाद/भिवधानोरा :भिवधानोरा (ता. गंगापूर) येथील मातीमध्ये ( Bhividhanoras Sai Chavan will Shine on Cricket Field ) बागडणाऱ्या सई सुभाष चव्हाण या ९ वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने ( Sai Chavan will Shine on Cricket Field ) पंधरा वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळण्याचा मान मिळवला आहे. जिद्द व चिकाटी तसेच ( Selected For Under 15 Girls Maharashtra Team ) मेहनतीच्या जीवावर सईने हे यश संपादन केले असून, संपूर्ण पंचक्रोशीत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पुणे येथील वायुसेना विद्यालयामध्ये 9 वीच्या वर्गात सई शिकतेसईचे मूळ गाव गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा असून, वडिलांच्या नोकरीनिमित्ताने ती पुणे येथे राहत आहे. पुणे येथील वायुसेना विद्यालयामध्ये 9 वीच्या वर्गात शिकत असून, तिने आतापर्यंत मुलींच्या खुल्या गटातील तसेच 19 वर्षांखालील गटातील विविध स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर आपल्या उत्तम कामगिरीचा ठसा उमटविला आहे. सध्या सई ग्यारी क्रिस्टन क्रिकेट इंडिया या ठिकाणी प्रशिक्षण घेत असून, सईचे सर्वत्र कौतुक होत आहे.