महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NCP Leader Attack On Thackeray Faction भाऊसाहेब चिकटगावकरांनी विधानसभेच्या तिकीटासाठी भावाच्या पाठीत खंजिर खुपसला - भाऊसाहेब ठोंबरे

भाऊसाहेब ठोंबरे यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये कलह सुरू झाला. त्यानंतर भाऊसाहेब चिकटगावकर ( Bhausaheb Thombare On Assembly Tickets ) यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाऊसाहेब चिकटगावकर यांच्यावर हल्ला सुरूच ठेवला आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदार सतिष चव्हाण ( Bhausaheb Thombare Criticize To Bhausaheb Chikatgaonkar ) आणि भाऊसाहेब ठोंबरे यांनी भाऊसाहेब चिकटगावर यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. विधानसभेच्या तिकीटासाठी भाऊसाहेब चिकटगावकरांनी भावाच्या पाठीत खंजिर खुपसल्याचेही यावेळी भाऊसाहेब ठोंबरे म्हणाले.

NCP Leader Attack On Thackeray Faction
भाऊसाहेब ठोंबरे

By

Published : Jan 3, 2023, 1:51 PM IST

औरंगाबाद -भाऊसाहेब ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर चव्हाण विरुद्ध चिकटगावकर ( Bhausaheb Thombare On Assembly Tickets ) यांच्यात अरोप - प्रत्यारोपच्या चांगल्याच फैऱ्या झडत आहेत. सोमवारी शहरातील राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत आमदार सतीश चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे यांनी चिकटगावकरांचा ( Bhausaheb Thombare Criticize To Bhausaheb Chikatgaonkar ) चांगलांच खरपूस समाचार घेतला. चिकटगावकरांनी विधानसभेच्या तिकीटासाठी ( NCP Leader Attack On Thackeray Faction ) भावाच्या पाठीत खंजिर खुपसला. पुतन्याला उभे करून त्याचा गेम केला. पक्षाची वाढ न करता तिकीट वाटपाची दुकानदारी करून स्वताचे घर भरणाऱ्या गद्दारांनी आम्हाला हुशारकी शिकवू नये, अशी खोचक टीकाही केली.

कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळाशहरातील ठक्कर बाजारात पक्षाची आढावा बैठक ( NCP Meeting In Aurangabad ) व प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, कार्याध्यक्ष मनोज घोडके, युवा नेते पंकज ठोंबरे, प्रहारमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले ज्ञानेश्वर घोडके यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात प्रहारचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके यांनी आपल्या शेकडो कार्यक्रत्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी स्वागत केले.

चिकटगावकरांना मुलाला विजयी करता आले का ?चिकटगावकरांना मुलाला पंचायत समितीत विजय मिळवता आला नाही. तेच दुसऱ्याला घडविण्याच्या गप्पा मारत आहेत. उलट जे लोक चिकटगावकरांमुळे पक्षापासून लांब गेले होते, तेच आता राष्ट्रवादीत पुन्हा परतले आहेत. आम्ही १९८० पासून शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. त्यामुळे काही वर्षांपुर्वी पक्षात आलेल्यांनी पक्षनिष्ठेच्या गोष्टी करु नयेत. येथून पुढे ज्यानी पक्ष सोडला, अशा चिल्लर माणसाच्या टीकेला उत्तर देवून त्यांना महत्व देवू नका, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना बैठकीत दिला. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवा, असे आवाहन भाऊसाहेब ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

ABOUT THE AUTHOR

...view details