महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Army Jawan Missing : वृद्ध आई वडिलांनी केले बेपत्ता मुलासाठी उपोषण; भागवत कराड यांनी माहिती घेतली अन्...

छत्रपती संभाजीनगरमध्ये सैन्य दलात कार्यरत असणारा मुलगा गेल्या १३ वर्षांपासून बेपत्ता असून त्याची काहीच माहिती मिळत नसल्याने वृद्धआई वडिलांनी उपोषण सुरु केले होते. भागवत कराड यांनी तातडीने सूत्रे हलविली व संरक्षण राज्य मंत्री अजय भट यांना बेपत्ता सैनिकाची माहिती काढली. त्यावेळी याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Army Jawan Missing
बेपत्ता मुलासाठी उपोषण

By

Published : Jun 2, 2023, 5:25 PM IST

आई वडिलांचे मुलासाठी उपोषण

छत्रपती संभाजीनगर: सैनिक मुलगा बेपत्ता झाल्याचे समजून त्याचे आई-वडील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. अशातच याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रयत्नांमुळे समोर आलेल्या माहितीनुसार, सैनिक रवींद्र पाटील याचा मृत्यू झाला. तसेच त्याच्यापत्नीला वेतन मिळत असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत मात्र आई वडिलांना माहितीच नव्हती. त्यामुळे पैशांसाठी नाती किती कमकुवत झाली असा प्रश्न पडला आहे.



आई वडील बसले होते उपोषणाला: सोयगाव तालुक्यातील रवींद्र पाटील हा 2005 मध्ये सैन्यात भरती झाला. मात्र 2010 नंतर त्याची कुठलीच माहिती आई-वडिलांना मिळत नव्हती. मुलगा सुट्टीवर परत येईल या आशेवर बरेच दिवस गेले. मात्र, त्याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे आई-वडिलांनी मुलगा आहे. कुठे याबाबत तपास सुरू केला. मात्र त्यांना माहिती मिळत नव्हती, रवींद्रचे वडील भागवत पाटील आणि बेबीताई पाटील यांनी त्याबाबत पाठपुरावा सुरूच ठेवला. वडिलांनी तो कर्तव्यावर असलेल्या जम्मू कश्मीरला जाऊन त्याबाबत चौकशी केली. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मुलाच्या शोधात जमिनीचा एक तुकडा देखील त्यांना विकावा लागला. तेरा वर्ष मुलगा आहे कुठे याबाबत उत्तर मिळत नसल्याने अखेर आई वडिलांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली होती.



डॉ. कराड यांच्या माध्यमातून सत्य आले समोर: सैनिक रवींद्र पाटील यांच्या आई वडिलांनी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी केंद्रात याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. दिल्लीत संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांना या उपोषणाबाबत आणि जवानाबाबत संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर भट यांचे सचिव पि.के.सुरेश कुमार, माजी सैनिक अशोक हंगे, कृष्णा राठोड यांच्यासोबत चर्चा केली व जवानाबाबत माहिती काढली. त्यात बेपत्ता असलेला जवान रवींद्र पाटील याचा मृत्यू झाला असल्याचे वास्तव समोर आले. इतकेच नाही तर त्याच्या पत्नीला 24 नोव्हेंबर 2022 पासून त्याच्या मृत्यूनंतरची पेन्शन सुरू झाली असे स्पष्ट झाले. मात्र याबाबत त्याच्या आई-वडिलांना कुठलीही माहिती देण्यात आली नाही, त्यामुळे आपला मुलगा या जगात नाही हे वास्तव देखील त्यांना कळाले नाही. त्याच्यावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलगा तर गेलाच मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याला त्याची माहिती देखील आपल्याला मिळू शकली नाही, याबाबतचा दुःख त्यांच्यासाठी वेदनादायी आहे.

हेही वाचा -

  1. Army Jawan Missing सैन्यात कर्तव्य बजावणारा मुलगा 2010 पासून बेपत्ता आईवडिलांचे उपोषण
  2. Girls Missing धक्कादायक महाराष्ट्रातून दररोज 70 तरुणी बेपत्ता नॅशनल क्राइम ब्युरोची माहिती
  3. Womens Missing From Maharashtra मार्चमध्ये राज्यातील तब्बल 2200 महिला बेपत्ता महिला आयोगाच्या अध्यक्षांची तातडीने कारवाई करण्याची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details