महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aurangabad IPL Match Betting : पोलिसांच्या कारवाईनंतरही वैजापूरमध्ये खेळला जातो खुलेआम सट्टा

औरंगाबादच्य वैजापूर शहरातील ( Aurangabad IPL Match Betting ) पंचायत समितीसमोरच्या जागेवर आयपीएल सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या ( Betting In Vaijapur ) दोघांना पोलिसांनी पकडून त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली. त्यामुळे सट्टेबाजांचा गोरखधंदा पुन्हा उजेडात आला आहे.

Aurangabad IPL Match Betting
Aurangabad IPL Match Betting

By

Published : Apr 20, 2022, 8:31 PM IST

Updated : Apr 20, 2022, 9:05 PM IST

वैजापूर (औरंगाबाद) - वैजापूर शहरातील पंचायत समितीसमोरच्या जागेवर आयपीएल सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या ( Betting In Vaijapur ) दोघांना पोलिसांनी पकडून त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली. त्यामुळे सट्टेबाजांचा गोरखधंदा पुन्हा उजेडात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात ही सट्टेबाजी अशीच निडरपणे सुरू असून या क्रिकेट सामन्याच्या सट्टेबाजीच्या माध्यमातून ( Aurangabad IPL Match Betting ) करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी लपूनछपून सट्टा चालायचा. परंतु आता सट्टेबाजांची दुकानं आता थेट रस्त्यावर आली आहे. त्यामुळे सट्टेबाजांच्या वेळीच अभय कुणाचे, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेस निर्माण झाला आहे.

सट्टा खेळणाऱ्यांची संख्या वाढली -वैजापूर पंचायत समितीसमोरच्या जागेवर आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्या दोघांना पकडून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन सट्टेबाजांकडून पोलिसांनी जवळपास साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धंद्यातील उलाढाल पाहता सर्वांनाच चकीत करणारी आहे. चारपट कमाई असल्यामुळे शहरात सट्टा खेळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पोलिसांनी कृष्णा धुळे व अजयसिंग राजपूत या दोन सट्टेबाजांना पकडले खरे. परंतु त्यांच्या पाठिमागील मुख्य सूत्रधार, करविता धनी दुसरेच कोणी असल्याचे समोर आले आहे. वैजापूर येथे राहून मुंबई, लखनौ व दिल्ली येथे होणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावून नागरिकांकडून पैसे उकळले जातात.

असा खेळला जातो सट्टा -फायरएक्सच व 99 क्रिक डाॅट काॅम या मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून हा सट्टा खेळवला जातो. राॅयल 1008 व किंग 23 पी या आयडीवरून हा खेळ सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आले. पोलिसांनी हे दोन सट्टेबाज पकडले खरे. परंतु जे गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सट्टेबाजीचा धंदा बिनबोभाटपणे करत आहे. त्यांच्यापर्यंत पोलीस यंत्रणा अजूनही पोहोचलेली नाही. या धंद्यातील छोटे मासे गळाले लागले असले तरी यांच्यापेक्षाही मोठे अनेक खिलाडी सट्टेबाजीतून करोडो रुपये कमवून गब्बर झाले आहेत. क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा लावणे हा प्रकार शहरवासियांसाठी नवीन नक्कीच नाही. गेल्या काही वर्षांपासून सट्टेबाजांनी छुप्या पध्दतीने दुकाने सुरू करून या धंद्यातील बरकत वाढविली आहे. क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारे वैजापूर शहर हे मराठवाड्याचे केंद्रच ठरले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई शून्य? -अवैध धंधे मोडीत काढण्यासाठी नेहमी औरंगाबाद जिल्ह्यातीत धडाकेबाज कारवाईसाठी अग्रेसरसमजल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेने या वर्षी खुल्लेआम सट्टा चालवणाऱ्या एकही सुत्रधावर किंवा सट्टा घेणाऱ्यांवर एकही कारवाई न केल्याने नागरिकांकडून शंखा उपस्थित केली आहे.

असे असते मॅनेजमेंट? -संबंधित यंत्रणेला हाताशी धरून यंत्रणेसह सट्टेबाजही मालामाल झाले. 'अर्थ'शास्त्राच्या जोरावर सर्वच यंत्रणा सट्टेबाजांच्या पायावर लोटांगण घेतात. पोलिसांनी शहरात सट्टेबाजांचा शोध घेण्याचे ठरविले किंवा मुख्य सुत्रधाराला पिंचाऱ्यात टाकायचे ठरवले तर, त्यांच्यासाठी ही कामगिरी नक्कीच अवघड नाही. परंतु त्यासाठी पोलिसांच्या प्रबळ इच्छाशक्तीची व खऱ्या पोलीसगिरीची गरज आहे.

मराठवाड्याचा मुख्य सूत्रधार कोण? -मराठवाड्यात प्रसिद्ध असणारा हा मास्टरमाईंड नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी धंदा चालवाच्या कधी औरंगाबाद शहरात, तर कधी मराठवाड्याचा सोयीस्कर असणाऱ्या कोणत्याही जिल्ह्यात जातो. मात्र, यावर्षी त्याने वैजापूर शहर निवडले आहे. कारण स्थानिक प्रशासनाच्या पाठबळव हा त्याचा मुख्य हेतू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

हेही वाचा -VIDEO : 'चंद्रकांत पाटील हे मुक्त विद्यापीठ', ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांचा मिश्किल टोला

Last Updated : Apr 20, 2022, 9:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details