महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sushma Andhare : 2023 पूर्वी माझे गेलेले भाऊ परत येतील; सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला विश्वास - अब्दुल सत्तार

इतर गटात गेलेले माजी शिवसैनिक 2023 पूर्वी आपल्या गटात परततील (Before 2023 my departed brothers will return) असा विश्वास शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Shiv Sena Deputy Leader Sushma Andhare) यांनी व्यक्त केला आहे. माझे त्या गटात गेलेले भाऊ परत येतील असा विश्वास आहे. काही भाऊ माझ्या संपर्कात आहेत, असे त्या म्हणाल्या. 2023मधे महाराष्ट्रात मध्यावती निवडणुका (Mid term Elections in Maharashtra 2023) होतील असे भाकितही त्यांनी केले. Aurangabad News

Sushma Andhare
सुषमा अंधारे मुलाखत

By

Published : Nov 19, 2022, 7:29 PM IST

औरंगाबाद :शिंदे गटात गेलेले माझे भाऊ अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची आणि सुसंस्कृतपणाची कधी गाठपेट पडली असेल अस मला वाटत नाही, अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Shiv Sena Deputy Leader Sushma Andhare) यांनी औरंगाबाद येथे केली. तर 2023मधे मध्यावती निवडणुका (Mid term Elections in Maharashtra 2023) होतील त्याआधी माझे गेलेले भाऊ परत येतील (Before 2023 my departed brothers will return) असे वक्तव्य त्यांनी केले. Aurangabad News

सुषमा अंधारे मुलाखत


माझ्या भावांना अडचणीत नाही आणणार....माझे त्या गटात गेलेले भाऊ परत येतील असा विश्वास आहे. काही भाऊ माझ्या संपर्कात आहेत. त्यांच्याविषयी बोलून त्यांना अडचणीत आणणार नाही असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. सध्या महाप्रबोधन यात्रा असून यामध्ये कोणालाही काही न बोलता साध्या आणि सभ्य भाषेत प्रश्न विचारणार आहे माझे काही चुकार भाऊ तिकडे आहेत ते परत येतीलच. मात्र लोकांच्या दैनंदिन प्रश्नावर चर्चा करणे आणि त्यावर बोलण्यासाठी मी हा दौरा करत आहे. सध्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जातोय त्यावर बोलणार असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.


माझ्या व्यक्तीत आयुष्यावर बोलण्याची गरज नाही...आजच्या युगात दोन व्यक्ती भिभक्त होणे काही नवीन नाही. माझ्या बाबत खाजगी आयुष्यावर चर्चा केली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पत्नीपासून विभक्त राहतात. माझ्या वयक्तिक आयुष्यावर बोलणे चकीचे आहे. कोणी प्रश्न विचारले तर त्यांना उत्तर देण्यास मी समर्थ आहे. तरी कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर त्याने जर बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार असतील आणि रुपयाचे मूल्य वाढणार असेल तर विचारा चालेल. जे माझे मित्र नाहीत ते शत्रू कसे असतील अस म्हणत सुषमा अंधारे यांनी टीकाकारांचा समाचार घेतला.


मनसेवर केली टीका...मनसेने राहुल गांधी यांच्यावर टीका करत सभेत निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. जिथे हजारो लोक सभेला उपस्थित राहणार आहेत. तिथे शंभर जन सभा उधळाला जातात हे हास्यस्पद आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे लोक, मुक्ताईनगर मध्ये माझ्या सभेला परवानगी नाकारतात हा प्रश्न आहे. मनसेने दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटू नये, स्वतःच्या लग्नाचेही पहावे अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. राहुल गांधी यांचा वक्तव्य पाहिले तर प्रत्येक पक्षाची वेगळी थाटणे असते आणि त्यानुसार त्यांची रणनीती असते. मात्र त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही असे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितल आहे. पैठण येथे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात सभा घेताना, त्यांना भावाच्या नात्याने समजावणार आहे. घरातील भांडण आहे, त्यामुळे प्रेमाने संदेश देईल असं सुषमा अंधारे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details