छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Bawankule On BJP Voting Percent:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेनऊ वर्षांत केलेलं काम प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी काम केलं जाणार असून जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचं काम करणार असल्याचं देखील बावनकुळे यांनी सांगितलं. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपा एका राज्यात आघाडीवर असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, देशात भाजपा नंबर एकचा पक्ष असून पाच राज्याच्या निवडणुकांमध्ये देखील आघाडीवरच असेल असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाचे अंदाज समोर आले असले आणि भाजपा पिछाडीवर असल्याचं दिसत असलं तरी प्रत्यक्षात निकालात भाजपाच नंबर एकचा पक्ष ठरेल असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024)
शेतकरीच माहिती देतील :पंतप्रधान फसल योजना ही फसवणारी योजना असल्याची टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान फसल योजनेचा फायदा होतो की नाही हे ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे त्यांनाच विचारायला पाहिजे, असे म्हटले. एक रुपयात पीक विमा भरून पीक नुकसानीची भरपाई पंतप्रधानांच्या योजनेमध्ये आहे. या योजनेचा फायदा असंख्य शेतकऱ्यांना झाला आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं.