महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संभाजीनगरच्या मुद्द्यावरून भाजप, शिवसेनेत बॅनर वॉर - Ambadas Danve criticizes BJP aurangabad

ऐतिहासिक शहराचे नाव बदनाम करण्यासाठी काही लोक जाणून बुजून प्रयत्न करत आहेत. यातून त्यांचा ढोंगीपणा जनतेसमोर येत आहे. मात्र लवकरच संभाजीनगरकर विरोधकांना नमस्ते करतील असा टोला नाव न घेता आमदार अंबादास दानवे यांनी भाजपला लगावला आहे.

संभाजीनगरच्या मुद्द्यावरून भाजप, शिवसेनेत बॅनर वॉर
संभाजीनगरच्या मुद्द्यावरून भाजप, शिवसेनेत बॅनर वॉर

By

Published : Jan 17, 2021, 9:37 PM IST

औरंगाबाद - ऐतिहासिक शहराचे नाव बदनाम करण्यासाठी काही लोक जाणून बुजून प्रयत्न करत आहेत. यातून त्यांचा ढोंगीपणा जनतेसमोर येत आहे. मात्र लवकरच संभाजीनगरकर विरोधकांना नमस्ते करतील असा टोला नाव न घेता आमदार अंबादास दानवे यांनी भाजपला लगावला आहे.

भाजप शिवसेनेत बॅनर वॉर

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्मार्ट सिटी योजनेतील विकासकामांच्या उद्घाटनासाठी शनिवारी औरंगाबादेत आले होते. यावेळी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरामध्ये नमस्ते संभाजीनगरचे बॅनर लावले होते. मात्र महापालिकेने काही वेळातच हे बॅनर काढून घेतल्याने, राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या वतीने महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत टीव्ही सेंटर परिसरात निदर्शन करण्यात आली. दरम्यान यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावरून अंबादास दानवे यांनी भाजपवर नाव न घेता टीका केली.

गुंठेवारी मदत केंद्रांची स्थापना करणार

दरम्यान निवडणुका येत राहतील जात राहतील शिवसेना संघर्ष करणार आहे. जनतेचे काम करण्याची, समाजसेवा करण्याची शिवसैनिकांना सवय झाली आहे. त्यामुळे आम्ही राजकारण न करता समाजसेवा करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लावला आहे. गुंठेवारी भागातील शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत शिवसेना गुंठेवारी मदत केंद्र स्थापन करून, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details