औरंगाबाद - बँक खासगीकरणाविरोधात युनायटेड फोरम बँक युनियनतर्फे बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपात राज्यातील 10 हजार शाखांमधील 50 हजारांहून अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. हा संप सर्वसामान्यांच्या हक्कासाठी असल्याच मत बँक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
आर्थिक मागणीसाठी नाही तर खातेदारांच्या हक्कासाठी संप
15 व 16 मार्च रोजी बँक कर्मचाऱ्यांनी पुकरलेला संप हा कुठल्याही आर्थिक मागणीसाठी नसून खातेदारांच्या ठेवीचे संरक्षण करण्यासाठी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना आयडीबीआय बँकेसह इतर दोन बँकांचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले आहेत. या निर्णयाला बँक कर्मचारी विरोध करत आहेत. सर्व सामान्यांची बचत धोक्यात येईल, त्यांना हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. याआधी येस बँक, बीएमसी बँक, ग्लोब ट्रस्ट बँख, कराड बँक या बँकांबंद केल्याचा अनुभव वाईट असल्याने ग्राहकांसाठी बंद पळाला जात असल्याची माहिती युनायटेड फोरम बँक युनियन संघटनेचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी दिली.