औरंगाबाद -प्रत्येक माणसाला आयुष्यात शिस्तीचे धडे हे कुटुंब, शाळा, कॉलेज आणि समाज यांच्याकडून मिळत असतात. विद्यार्थ्याची जडणघडण ही शाळेपासून सुरू होते. चांगली शिस्त, कडक नियम यांचे पालन करण्यासाठी त्याला प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी सांगितले जाते. मात्र, अविचारी शिस्तीचे नियम विद्यार्थ्यांवर थोपवण्यात आले तर?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नोटीस हेही वाचा -बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर 'या' तीन खेळाडूंची संघातून होऊ शकते गच्छंती
असाच काहीसा प्रकार औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घडला आहे. येथील अनेक नियमांना घेऊन आधीच विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला जात होता. आता त्यात अजून एका नियमाची भर पडली आहे. या विद्यापीठात मुलींच्या वसतीगृहाच्या गेटवर एक नोटीस लावण्यात आली. 'मुलींनी कोणत्याही मुलाशी बोलू नये, नोट्स घ्यायच्या असतील तर त्या वॉचमेनच्या माध्यमातून घ्यावात. या नियमाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल तसेच घरच्यांनाही याबाबत सांगण्यात येईल ', अशा स्वरुपाची नोटीस गेटवर लावण्यात आली होती.
मुलींच्या वसतीगृहाच्या गेटवरील नोटीस मुलींच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न असल्याने त्याचा निषेध म्हणून सर्व मुलींनी प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवत निदर्शन केली. तसेच लावण्यात आलेल्या नोटीसचा मुलींनी निषेध करत ही नोटीसही फाडून टाकली. विशेष म्हणजे या नोटीसवर कोणत्याही अधिकृत व्यक्ती अथवा अधिकाऱ्याचे नाव नाही. त्यामुळे नेमकी ही नोटीस कोणी लावली?, आणि त्याचा हेतू काय होता? हे अजुनपर्यंत समोर आलेले नाही.