औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील ऋषीकेश अशोक बोचरे हा जवान लडाख, जम्मू काश्मीर येथे देशाचे संरक्षण करताना हुतात्मा झाला आहे. दूरध्वनीद्वारे ही बातमी देवगाव रंगारी येथे पोहचली आहे.
औरंगाबाद : देवगाव रंगारी येथील जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण - औरंगाबादच्या जवानाला वीरमरण
ऋषीकेश अशोक बोचरे (वय 27) हा जवान लडाख, जम्मू कश्मीर येथे कर्तव्यावर असताना त्याला वीरमरण आले. ही बातमी ॠषीकेशच्या गावात पसरताच गावात शोकाकूल वातावरण झाले आहे.

ऋषीकेश अशोक बोचरे (वय 27) हा जवान लडाख, जम्मू कश्मीर येथे कर्तव्यावर असताना त्याला वीरमरण आले. ही बातमी ॠषीकेशच्या गावात पसरताच गावात शोकाकूल वातावरण झाले आहे. ऋषीकेशचे 6 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यामुळे गावात आणि कुटुंबावर मोठे संकट पसरले आहे.
याबाबत दूरध्वनीद्वारे तहसीलदार संजय वारकड यांच्याशी बोलणे झाले. पूर्ण सैन्य प्रक्रिया झाल्यावर त्याचे पार्थिव येथे आणण्यात येईल. कदाचित उद्या पार्थिव येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. ऋषीकेश बोचरे याच्या पश्चात पत्नी, वडील, आई, एक भाऊ, बहिण, भाऊजय, आजी असा परिवार आहे.