औरंगाबाद- ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे यांनी गावांना अचानक भेटी दिल्या. यामध्ये पाच गावातील ग्रामसेवक गैरहजर आढळून आले. यामुळे गैरहजर ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार जिल्हा परिषदेने ग्रामसेवकांना स्थानिक पातळीवर राहून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाढत्या रुग्णसंख्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी ग्रामीण भागातील गावांना अचानक भेटी दिल्या.