औरंगाबाद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणबी सेनेला घटक पक्षाचा दर्जा देवून समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याची सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे युती तुटल्यास भाजपला साथ देऊ, अशी भूमिका कुणबी सेनेने घेतली आहे, अशी माहिती कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी येथे दिली. शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणबी संघटनेने शहरात बैठक घेतली. हेही वाचा -अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणबी संघटनेने शहरात बैठक घेतली. राज्यातील 120 जागांवर कुणबी समाजाचा प्रभाव आहे. त्यामुळे महायुतीकडे आम्ही 20 जागांची मागणी करत आहोत. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -नेमका का दिला अजित पवारांनी राजीनामा?
महाराष्ट्र कुणबी समाज विकास मंडळ, उस्मानाबाद, अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ, नांदेड, कुणबी मराठा संघटना, वसमत, कुणबी सेना, गंगाखेड, पुरोगामी मराठा संघटना, सक्रीय कुणबी समाज मंडळ, मालाड, मुंबई, कुणबी विकास मंडळ, सांताक्रुझ, मुंबई, कुणबी समाजातील मंडळ, यवतमाळ, कुणबी युवा संघ, जालना, कुणबी महासंघ, नागपूर, कुणबी सेना, खान्देश या संघटना आपल्यासोबत असल्याचा दावाही विश्वनाथ पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा -सरकार अन् उद्योगपतींमध्ये अविश्वास वाढत आहे - उद्योगपती अजय पिरामल
राजकारणाशिवाय संपूर्ण कर्जमाफी करावी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, कुणबी महामंडळ करावे, सिंचन व्यवसायाला बळ देऊन शेतकरी सक्षम करावा, कुणबी असताना प्रमाणपत्र न देणाऱ्यांना चाफ लावावा, अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत. तसेच कुणबींना ओबीसीत नव्हे तर स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करुन आमच्या वाट्याचे आरक्षण द्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेला स्नेहबंधचे बी. बी. पाटील, लातुरच्या कुणबी समाजोन्नती मंडळाचे भागवत धायगुडे, अखिल भारतीय कुणबी मराठा संघटनेचे मनिष वडजे, कुणबी युवा सेनेचे ऍड. राम कुऱ्हाडे, कुणबी संघटनेचे दत्ता इंगळे यांची उपस्थिती होती.