महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 19, 2022, 2:16 AM IST

ETV Bharat / state

Asia Book Of Record For Jump Rope : शिक्षकाने एका मिनीटात 152 दोरीवरच्या उड्या मारुन केला नवा विक्रम

औरंगाबादमधील शिक्षकाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एका मिनिटात 152 दोरी उड्या मारत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली ( Asia Book Of Record For Jump Rope ) आहे. सुयश नाटकर असे त्यांचे नाव आहे.

Suyash Natkar Record Jump Rope
Suyash Natkar Record Jump Rope

औरंगाबाद - येथील क्रीडा शिक्षकाने विशेष उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. एका मिनिटात 152 दोरीवरच्या उड्या मारत या शिक्षकाने विक्रम प्रस्थापित केला आहे. सुयश नाटकर असे त्यांचे नाव आहे. त्यांची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड ( Asia Book Of Record For Jump Rope ) आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ( India Book Of Record For Jump Rope ) नोंद झाली आहे.

दोन विक्रमांची केली नोंद

सुयश नाटकर क्रीडा शिक्षक ( Suyash Natkar Record Jump Rope ) आहेत. ते विद्यार्थ्यांना दोरीवरच्या उड्या आणि स्केटिंग सारखे क्रीडा प्रकार शिकवतात. यापुर्वी दोरीवरच्या उड्या मारण्यात तीस सेकंदात 74 उड्या असा विक्रम नोंदवला गेला होता. तो विक्रम मोडण्यासाठी सुयश यांनी तयारी केली. आणि 30 सेकंदात 95 तर एक मिनिटात 152 उड्या मारून नवा विक्रम रचला.

सुयश नाटकर यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

क्रॉस उडी मध्ये केला विक्रम

सहसा सरळ हात फिरवत दोरी वरच्या उड्या मारल्या जातात. मात्र, सुयश यांनी विक्रम करताना हात क्रॉस करून उड्या मारत हा विक्रम प्रस्थापित केला. सरळ हाताने दोरी वरच्या उड्या मारणे थोडे सोपे जात असे. पण, हात क्रॉस करून उड्या मारणे अवघड होते. वर्षभराच्या सरावानंतर ते शक्य झाले. विक्रम करत असताना मनावर दडपण होते. पहिल्यांदा रेकॉर्ड करताना दोन ते तीन वेळेस सराव केल्यावर विक्रम रचल्याचे सुयश नाटकर म्हणाले.

प्रमाणपत्र मिळवण्यास संघर्ष

एशिया बुक ऑफ रेकॉर्ड ( Asia Book Of Record For Jump Rope ) आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ( India Book Of Record For Jump Rope ) सुयश नाटकर यांनी विक्रम केल्याचा मेल त्यांना प्राप्त झाला. परंतु, एका विक्रमासाठी प्रत्यक्षात प्रमाणपत्र, जीएसटी आणि इतर खर्च यासाठी जवळपास 20 हजार रुपये, असा दोन विक्रमासाठी चाळीस हजार रुपयांचा खर्च येतो. मित्र परिवाराच्या सहाय्याने हे पैसे जमवून प्रमाणपत्र मिळेल, असा विश्वास सुयश नाटकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -Kolhapur Thief Caught By Judge : 'तो' चोरत होता महिलांची अंतर्वस्त्रे; न्यायाधिशांनीच रचला सापळा अन्

ABOUT THE AUTHOR

...view details