महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत आज 'या' भागात आढळले नवे रुग्ण, पुन्हा मोठी वाढ - औरंगाबाद कोरोना रुग्णांची संख्या

औरंगाबाद जिल्ह्यात कोविडच्या रुग्णात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी नवे 47 कोरोनाबाधित आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 1 हजार 696 झाली आहे.

Aurangabad records 47 new corona positive cases
औरंगाबादेत आज 'या' भागात आढळले नवे रुग्ण, पुन्हा मोठी वाढ

By

Published : Jun 3, 2020, 10:11 AM IST

औरंगाबाद- जिल्ह्यात कोविडच्या रुग्णात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी नवे 47 कोरोनाबाधित आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 1 हजार 696 झाली आहे. यापैकी 1 हजार 85 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले असून 85 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 526 अ‌ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आहे.

बुधवारी सकाळी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जसवंतपुरा (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), खोकडपुरा (2), अजिंक्य नगर (1), समता नगर (2), समृद्धी नगर, एन-4 सिडको (1), जय भवानी नगर (1), लेबर कॉलनी (2), मिल कॉर्नर (4), हमालवाडी, रेल्वे स्टेशन (1), भावसिंपुरा (2), शिवशंकर कॉलनी (5), पिसादेवी रोड (1), कटकट गेट (1), सिल्लेखाना नूतन कॉलनी (1), बारी कॉलनी (1), उल्का नगरी (1), एन-सहा, संभाजी कॉलनी, सिडको (1), शरीफ कॉलनी (1), कैलास नगर (4), स्वप्न नगरी, गारखेडा परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), पुंडलिक नगर रोड, गारखेडा (1), विद्यानिकेतन कॉलनी (1), सुराणा नगर (2), अन्य (3) आणि यशवंत नगर, पैठण (3), अब्दुलशहा नगर, सिल्लोड (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 21 महिला आणि 26 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एन-चार ‍सिडको परिसरातील कोरोनाबाधित 74 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 68, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 16, मिनी घाटीमध्ये एक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 85 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details