महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद अपघात : जीव वाचलेल्या मजुराने सांगितली आपबिती!

लॉकडाऊनमुळे काम बंद पडल्याने आम्हाला गावी जायचे होते. त्यासाठी आम्ही अर्ज केला होता. मात्र, परवानगी मिळाली नसल्याने आम्ही गुरुवारी रात्री सातच्या सुमारास औरंगाबादच्या दिशेने चालत आलो. आम्हाला भुसावळला जायचे होते.

aurangabad railway acciden
aurangabad railway acciden

By

Published : May 8, 2020, 5:35 PM IST

औरंगाबाद- करमाड येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. रेल्वे रुळावर असलेल्या परप्रांतीय मजुरांना रेल्वेने चिरडले. यात 16 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण अपघातात बचावले आहेत.

हेही वाचा-बापरे! आर्थर रोड कारागृहात 77 कैदी, 26 कर्मचाऱ्यांसह तब्बल 103 जणांना कोरोनाचा संसर्ग

हे सर्व मजूर जालना जिल्ह्यातील स्टील कंपनीत काम करत होते. या सर्वांनी गावी जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र, ती मिळाली नसल्याने त्यांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला. पायी जात असताना पहाटे चारच्या सुमारास ते रेल्वे रुळावर झोपले असता त्यांना रेल्वच्या मालगाडीने चिरडले.

या अपघातात बचावलेल्या विरेंद्रसिंग गौर याने आपबिती सांगितली. आम्ही रुळाच्या खाली असल्याने वाचलो. जालना जिल्ह्यातील स्टील प्लांटमध्ये आम्ही काम करत आहोत. लॉकडाऊनमुळे काम बंद पडल्याने आम्हाला गावी जायचे होते. त्यासाठी आम्ही अर्ज केला होता. मात्र, परवानगी मिळाली नसल्याने आम्ही गुरुवारी रात्री सातच्या सुमारास औरंगाबादच्या दिशेने चालत आलो. आम्हाला भुसावळला जायचे होते. तिथून गावाकडे जाण्यासाठी रेल्वे मिळेल का, हेच आम्ही पाहणार होतो. सकाळी चारच्या सुमारास आमच्यातील काही लोक पुढे गेले होते. ते रेल्वे रुळावर विश्रांती करण्यासाठी थांबले होते. रेल्वेगाडी आल्यावर आम्ही मागून ओरडलो. मात्र, सर्वजण थकल्याने त्यांना झोप लागली होती. त्यांना आवाज ऐकू आला नाही आणि हा अपघात झाला.

या अपघातात धनसिंग गोंड, निरवेश सिंग गोंड, बुद्धराज सिंग गोंड, श्रीदयाल सिंग, रबेन्द्र सिंग गोंड, राजबोहरम पारस सिंग, दिपक सिंग अशोक सिंग गौड, धर्मेंद्रसिंग गोंड, (सर्व अंतवळी जि. शहडोल, मध्यप्रदेश), सुरेश सिंग कौल (जि. शहडोल, मध्यप्रदेश), बिगेंद्र सिंग चैनसिंग, प्रदीप सिंग गोंड, (रा. दोघे जमडी, ता. पाळी, जि. उमरिया मध्यप्रदेश), ब्रिजेश भेयादीन (रा. बहिरा इटोला, शहरगड चाटी, जि. शहडोल), मुनिमसिंग शिवरतन सिंग, (रा. नेवासा, बकेली ता. पाळी, जि. उमरिया), नेमशाह सिंग चमदु सिंग, (रा. नेवासा, बकेली, जि. उमरिया), अच्छेलाल सिंग (रा. चिल्हारी, मानपुर जि. उमरिया), संतोष नापित या 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर सज्जनसिंग माखनसिंग धुर्व (रा. पौडी ता. जुनावणी जिल्हा मंडल), इंद्रलाल कमलसिंग धुर्वे (रा.पोवडी ता. घोगरी जि. मांडला), वेरेंद्रसिंग चेंनसिंग गौर (रा ममान ता पाली जि. उमरिया), शिवमानसिंग हिरालाल गौर (रा. शाहारगड ता शाही जि. शहडोल) यांचा रेल्वेपटरीच्या बाहेर असल्याने जीव वाचला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details