महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत महिलांना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई - aurangabad police action

पुंडलिक नगर भागात मद्यपान करून महिला व मुलींना त्रास देणाऱ्या टावळखोरांवर पुंडलिक नगर पोलिसांनी कारवाई केली आहे.

औरंगाबादेत महिलांना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई
औरंगाबादेत महिलांना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई

By

Published : Feb 7, 2021, 5:37 PM IST

औरंगाबाद - पुंडलिक नगर भागात मद्यपान करून महिला व मुलींना त्रास देणाऱ्या टावळखोरांवर पुंडलिक नगर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत तरुणांना भर मैदानात चांगलाच चोप दिला गेला आहे.

पुंडलिक नगर येथे दोन दिवसांपूर्वी पोलीस नागरिक स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पुंडलिक नगर रस्त्यावरील बीयरबारसमोर थांबणाऱ्या टवाळखोरांची भीती वाटते अशी तक्रार मुलीने पोलीस आयुक्ताकडे केली होती. यावर पोलीस आयुक्तांनी टवाळखोरांना त्यांची जागा दाखवण्यात येईल. महिला, मुलींनी बिनधास्त कुठेही जावे, कुणालाही घाबरायचे नाही, येथील पोलीस टवाळखोरांना धडा शिकवतील, असे आश्वासन दिले होते. याच पार्श्भूमीवर पुंडलिक नगर पोलिसांनी टावळखोरांवर कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details