औरंगाबाद -ऑल इंडिया उलेमा बोर्डाने वंचित बहुजन आघाडिला पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी बोर्डातील सदस्यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तसे पाठिंबा पत्रक दिले. यावेळी आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर यांनी एमआयएमने वंचितसोबत येण्याचा पुन्हा विचार करावा असे म्हटले आहे.
एमआयएम आणि ओवेसी सोबत राजकीय संबंध तुटले असले, तरी आमचे वैयक्तीक संबंध आजही तसेच, प्रकाश आंबेडकर यांचे औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत वक्तव्य हेही वाचा... किरीट सोमय्यांनी सेनेला पुन्हा डिवचले; म्हणाले..
एमआयएमने वंचितपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना आंबेडकर यांनी, 'आम्ही त्यांना सांगितले आहे, फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. पण ते सोबत न आल्यास आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आहोत., असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
हेही वाचा... विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेत संभ्रम, सूत्रांची माहिती
ऑल इंडिया उलेमा बोर्डाने वंचितला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. अनेक मुस्लीम संघटना लोकसभेलाही वंचित सोबत होत्या आणि आता विधानसभेलाही सोबत असल्याचे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
हेही वाचा... राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे ? - बाळासाहेब थोरात
वंचितकडून मुस्लीम समाजाला 28 जागी प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीत वंचित 288 जागा लढवणार आहे. सध्या कोणासोबतही कोणत्याही प्रकारची आघाडी नाही. मात्र वंचित शेतकरी संघटना, सिपीआई, सिपीएम, सत्य शोधक पार्टी, वामनराव चटप, यांच्या सोबत आघाडी कायम राहील, असे आंबेडकर यावेळी म्हणाले. तसेत मुस्लीम समाजाचा वाढता प्रतिसाद पाहता मुस्लीम समाजाला 28 जागी प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता असल्याचेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.