औरंगाबाद - घाटी व पुंडलिक नगर परिसरातील रस्त्यालगतची वाहतुकीला अडथळा ठरत असलेली अतिक्रमने, शुक्रवारी शहर वाहतूक शाखा, सिडको वाहतूक शाखा व मनपा अतिक्रमण विभागातर्फे करण्यात आलेल्या कारवाईत हटविण्यात आली. यावेळी घाटी परिसरातील 17 अतिक्रमने हटविण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात अवैध अतिक्रमणावर हातोडा; पोलीस मनपाची संयुक्त कारवाई
शहरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत अतिक्रमणे थाटलेली असून या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे मनपा व पोलीस प्रशासन यांच्या वतीने संयुक्त मोहीम राबवून अशी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे.
शहरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत अतिक्रमणे थाटलेली असून या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळेच अनेक वेळा वाहतूक कोंडी झाल्याचे प्रकार घडत असतात त्यामुळे मनपा व पोलीस प्रशासन यांच्या वतीने संयुक्त मोहीम राबवून अशी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत शुक्रवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) पानचक्की व पुंडलिक नगर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी घाटी जवळील 17 अतिक्रमणे हटविण्यात आली आहे. सदरील कारवाई पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलीस निरीक्षक शरद इंगळे, अतिक्रमण विभाग पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.