महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद पालिकेच्या स्थायी समीतीची सोमवारी सभा; विधानसभेच्या तोंडावर विविध प्रस्ताव मंजुरीची शक्यता - aurangabad municipal corporation

मनपाच्या स्थायी समितीची सभा सोमवारी आयोजित करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वीची ही शेवटची सभा ठरण्याची शक्यता आहे. समतीचे समाधान न झाल्याने दोन महिन्यापूर्वी स्थगित करण्यात आलेल्या 'हर्सूल कचरा प्रक्रिया' केंद्राच्या प्रस्तावासह अन्य महत्त्वाचे विषय मंजुरीकरता ठेवण्यात आलेले आहेत.

औरंगाबाद मनपा

By

Published : Sep 15, 2019, 11:00 PM IST

औरंगाबाद - मनपाच्या स्थायी समितीची सभा सोमवारी आयोजित करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वीची ही शेवटची सभा ठरण्याची शक्यता आहे. समतीचे समाधान न झाल्याने दोन महिन्यापूर्वी स्थगित करण्यात आलेल्या 'हर्सूल कचरा प्रक्रिया' केंद्राच्या प्रस्तावासह अन्य महत्त्वाचे विषय मंजुरीकरता ठेवण्यात आलेले आहेत.

औरंगाबाद पालिकेच्या स्थायी समीतीची सोमवारी सभा

हेही वाचा - महागड्या वस्तू स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून ३० जणांना गंडविले

मनपाच्या स्थायी समितीच्या सभेला सोमवारी साडेअकरा वाजता प्रारंभ होईल. येत्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता या आठवडाभरात लागण्याची शक्यता असल्याने, स्थायी समितीचे समाधान न झाल्याने अडवण्यात आलेला 'हर्सूल कचरा प्रक्रिया' केंद्राच्या प्रस्तावासह अन्य 9 विषय मंजुरी करता ठेवण्यात आले आहे. दोन महिन्यापूर्वी 15 जुलै रोजी पार पडलेल्या स्थायीच्या सभेत देखील 16 कोटी 89 लाख रुपयांच्या निवीदेत दीडशे टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया केंद्र उभारणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. संबंधित ठेकेदारावर नगर येथील कचरा प्रक्रिया केंद्रासंबंधी बनावट खताचे प्रकरण सुरू असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले व स्थायीचे समाधान न झाल्याने या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली.

मंजुरीकरता ठेवण्यात आलेले प्रस्ताव -

गेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वतः मनपा आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती केल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासह फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राकरता रसायन सामग्री खरेदी संबंधी 42 लाख 48 हजारांचा प्रस्ताव, प्रजनन व बाल आरोग्यायासंबंधी काम करणाऱ्या एक वैद्यकीय अधिकारी व 25 कर्मचाऱ्यांना मुदतवाढ व वेतनाचा खर्च मनपा फंडातून करणे, जय भवानीनगर येथील सिमेंट रस्त्या करता ठेकेदारांने निविदेपेक्षा 4.24 टक्के जास्त दराने काम करण्यास संमती दर्शविल्याचा, मिटमिटा येथील सनी सेंटर ते तुळजाभवानी मंदिर या रस्त्याचा काँक्रिटीकरण याकरिता 13.21 टक्के कमी दराने आलेली निविदा, एमआयटी हॉस्पिटल ते एमआयटी महाविद्यालय या रस्त्याचा काँक्रिटीकरण याकरता संबंधित ठेकेदाराने 15.75% जास्त दराने निविदा भरली होती. परंतु, आता अंदाज पत्रकापेक्षा 4 टक्के जास्त दराने काम करण्यास संमती दर्शवल्याने हा प्रस्ताव देखील स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीकरता ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील 'नाझिया'चा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details