औरंगाबाद- कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाने 30 मार्च ते 8 एप्रिलप्रयत्न टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या टाळेबंदीमध्ये उद्योग सुरू ठेवण्यात आल्याने औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. फक्त उद्योजकांच्या लॉबीला खूश करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
आरोग्य यंत्रणेवर सध्या ताण पडत असून सरकारी दवाखान्यातील अनेक जागा रिक्त आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भराव्यात, यासाठी अनेकवेळा मागणी केली आहे. मात्र, जागा भरण्यासाठी हालचाली झाल्या नाहीत. एकीकडे रुग्ण वाढत असताना फक्त कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून जागा भरत नाही आहात का? असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला. रुग्णाच्या आरोग्याला काही झाले तर त्याला रुग्णालय जबाबदार असतील हे लक्षात घ्या, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा खासदार जलील यांनी पत्रकार परिषदेत दिला.