महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Leopard Aurangabad : सोयगावात वेळेवर उपचाराअभावी बिबट्याचा मृत्यू

सोयगावात वेळेवर उपचाराअभावी बिबट्याचा मृत्यू ( Leopard death in Soyagaon ) झाल्याची घटना घडली आहे. बिबट्याचे तीन डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले असून मृत्यूमागील कारण शोधण्यात येत आहे. प्रकरणातील बिबट्याचा शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नसल्याने या प्रकरणाची कारवाई गुलदस्त्यातच असल्याचे समजते.

Aurangabad  Leopard suffers death in Soyagaon
Leopard Aurangabad : सोयगावात वेळेवर उपचाराअभावी बिबट्याचा मृत्यू

By

Published : Feb 27, 2022, 7:52 AM IST

औरंगाबाद - सोयगाव तालुक्यातील जरंडी वन बिटातील काटीखोरा शिवारात अमरसिंग राजपूत यांच्या शेतात गुरुवारी बिबट्या ( Leopard suffers death in Soyagaon ) आढळून आला. याची माहिती त्यांनी वनविभागाला देतातच रेस्क्यू टीम व वनाधिकाऱ्यांनी बिबट्यास उपचाराकरिता वेताळवाडी रोपवाटिका येथे हलवले. त्याठिकाणी तीन तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्व सोयीसुविधाची व्यवस्था करून अत्याधुनिक पद्धतीने उपचार झाले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली बिबट्याच्या प्रकृतीत सकारात्मक सुधारणा होत असताना अखेर शुक्रवारी दुपारी दोन वाजेदरम्यान बिबट्याने अखेरचा श्वास घेतला.


अत्यावस्थेत असलेल्या बिबट्याचे तीन डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले असून मृत्यूमागील कारण शोधण्यात येत आहे. बिबट्याचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळा, औरंगाबाद येथे पाठविण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणी वनविभागाने तपास सुरू केला असून कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात कोणालाही कोणत्याही स्वरूपाची माहिती असल्यास वनविभागास माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवून त्यांना योग्य ते बक्षिस देण्यात येईल, असे वानपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव राहुल सपकाळ यांनी आवाहन केले.

वनविभागाच्या प्रयत्नांची पराकाष्ठा -


वनविभागातील कर्मचाऱ्यांनी बिबट्याचे प्राण वाचवण्यासाठी तीन डॉक्टरांचे पथक व रेस्क्यू टीम यांना पाचारण करून उपचाराची साधने, औषधे, ऑक्सिजन सिलेंडर व इतर सर्व आवश्यक सुविधांची उपलब्ध करून दिली. तसेच औरंगाबाद व गुजरात येथील डॉक्टरांशी संपर्क साधून बिबट्याचे प्राण वाचविण्याचे कसोशीने प्रयत्न केले होते. पण, ते बिबट्याचे प्राण वाचवू शकले नाही. आता या प्रकरणातील बिबट्याचा शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नसल्याने या प्रकरणाची कारवाई गुलदस्त्यातच असल्याचे समजते.

हेही वाचा -Leopard in Kirpe Village : कराड तालुक्यातील किरपे गावात बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद

ABOUT THE AUTHOR

...view details