औरंगाबाद -भूसंपादन उपजिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री सातारा परिसर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दीपक घाटगे, असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून ते मागील काही महिन्यांपासून आजारी होते. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
औरंगाबाद भूसंपादन उपजिल्हाधिकाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या - औरंगाबादेतील भूसंपदान उपजिल्हाधिकारी दीपक घाटगे
औरंगाबादेतील भूसंपदान उपजिल्हाधिकारी दीपक घाटगे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय येथे भूसंपादन विभाग उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले दीपक रामराव घाटगे (वय 45) हे सातारा परिसरातील ऊर्जानगर येथे राहत होते. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. सुट्टी न मिळाल्याने आजारी असताना देखील त्यांनी निवडणुकीच्या काळात कर्तव्य बजावले होते. बुधवारी मध्यरात्री ते घरी असताना त्यांना आवाज दिला असता त्यांच्या खोलीमधून कोणतेही प्रत्युत्तर मिळाले नाही. त्यामुळे नातेवाईकांनी डोकावून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले. त्यांना रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.