महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात आणखी एका पत्रकाराचा कोरोनाने मृत्यू

औरंगाबादमधील दैनिक सामनाचे पत्रकार राहुल डोल्हारे यांचे कोरोनाने निधन झाले. ते मूळ बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील होते.

journalist rahul dolhare
पत्रकार राहुल स्वामीदास डोल्हारे

By

Published : Sep 14, 2020, 10:19 PM IST

औरंगाबाद -येथील दैनिक सामनाचे पत्रकार राहुल स्वामीदास डोल्हारे (वय - 49, रा. संघर्षनगर) यांचा सोमवारी कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्यावर मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राहुल यांना दहा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

राहुल डोल्हारे हे मूळ बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील होते. पूर्णा येथे शालेय शिक्षण पूर्ण करुन ते औरंगाबादमध्ये आले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण घेतले. पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर एकमत, देशोन्नती आदी. दैनिकांत अनेक वर्षे त्यांनी काम केले. अतिशय दिलखुलास, मनमिळावू आणि कष्टाळू स्वभावाचे राहुल डोल्हारे पत्रकारितेत सर्वपरिचित होते.

दैनिक सामनाच्या औरंगाबाद येथील आवृत्तीत ते गेले सात वर्षापासून सेवारत होते. पत्रकार संघटनेच्या बांधणीतही ते अग्रेसर होते. त्यांच्या निधनाने औरंगाबाद वृत्तपत्रसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

याआधी नागपुरातील तीन पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू -

फक्त 24 तासांत नागपूरच्या पत्रकारिता क्षेत्रातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सलग सहा महिने कोरोनाशी लढा देत आपले कर्तव्य बजावणाऱ्या या तिघांनाही कोरोनाची लागण झाली होती. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सागर जाधव, सुनील शेट्टी, नितीन पाचघरे अशी या तिनही पत्रकारांची नावे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details