महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिक्षणात महिलांच्या गळतीमागे स्वच्छतागृहांची भूमिका महत्वाची, 15 दिवसांत सर्वेक्षण करण्याचे निर्देश

महिलांची शिक्षणातील गळती वाढत असून स्वच्छता गृह त्यातील एक प्रमुख कारण आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये स्वच्छता गृहांची 15 दिवसांत सर्वेक्षण करून महिला स्वच्छता गृहांना आवश्यक त्या सुविधा द्याव्यात असे निर्देश दिल्याच रहाटकर यांनी सांगितलं.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

By

Published : Jun 11, 2019, 7:21 PM IST

औरंगाबाद - राज्यातील सर्व शाळांमध्ये स्वच्छता गृहांची 15 दिवसांत सर्वेक्षण करावे. महिला स्वच्छतागृहांना आवश्यक त्या सुविधा द्याव्यात असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज औरंगाबाद येथे दिले. स्वच्छता गृह नसल्याने मुलींचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण वाढले. यासंदर्भात राज्य महिला आयोग योग्य ते पाऊल उचलणार असल्याचं रहाटकर यांनी सांगितलं.

स्वच्छता गृह नसल्याने मुलींचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण वाढल्याचे रहाटकर यांनी सांगितले


औरंगाबादेत महिला तक्रार जनसुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत जवळपास ३८ तक्रारी आयोगासमोर आल्या. या तक्रारीमध्ये पोलीस विभागातील कुटुंबाच्या तक्रारी देखील असल्याची माहिती विजया रहाटकर यांनी दिली. इतकच नाही तर रंगाबादेत जेंडर रिसर्च सेंटर सुरु करण्याचे आदेश महानगर पालिकेला दिले असल्याची माहिती महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी औरंगाबादेत दिली. या रिसर्च सेंटर मध्ये महिलांच्या सक्षमीकरणबाबत त्याचबरोबर महिलांचे काउन्सेलिंग करण्याचे काम केले जाणार असल्याचे देखील रहाटकर यांनी सांगितलं.


राज्य महिला आयोगातर्फे सुभेदारी विश्रामगृहात जनसुनावणी घेण्यात आली. जनसुनावणी झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषद घेतली. औरंगाबादेत मह्नगर पालिकांना जेंडर रिसर्च सेंटर सुरु करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती ही त्यांनी दिली. या रिसर्च सेंटर मध्ये महिलांची गरज असल्यास लग्नाआधी आणि लग्नानंतर समोपदेषण केल जाणार आहे. शहरातील विचारवंत महिला या केंद्रात काम करू शकणार आहेत. इतकच नाही तर महिलासाठी असणारे कायदे, योजना महिलापर्यंत पोहचवण्याचं काम या केंद्रामार्फत केल जाणार आहे.


महिलांची शिक्षणातील गळती वाढत असून स्वच्छता गृह त्यातील एक प्रमुख कारण आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये स्वच्छता गृहांची 15 दिवसांत सर्वेक्षण करून महिला स्वच्छता गृहांना आवश्यक त्या सुविधा द्याव्यात असे निर्देश दिल्याच रहाटकर यांनी सांगितलं. महिलांची जनसुनावणी घेत असताना पोलीस कुटुंबातील महिलेची तक्रार आली असून त्याबाबत संबंधित पोलीस आयुक्तांना लक्ष घालण्याचे निर्देश रहाटकर यांनी दिल्याचे सांगितले. भाजपा सरकार महिलांना ३३ टक्के आरक्षण देणार असल्याचे देखील विजया रहाटकर पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details