कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची लासूरला भेट - sunil chavan
कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कन्टेन्मेंट झोन बनविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
गंगापूर(औरंगाबाद) : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लासुरगावला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी भेट देत आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कन्टेन्मेंट झोन बनविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब
लासूर गावात कोरोनाचे एकूण 22 रुग्ण सापडले असुन 2 रुग्ण होम आयशोलनमध्ये आहेत. वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले. सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले. प्रसारमाध्यमांनी जनतेत जनजागृती करण्याचे आवाहनही चव्हाण यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, एस.डी.एम.माणिक आहेर, गंगापूरचे तहसीलदार अविनाश शिंगटे, वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड, वैद्यकीय अधिकारी विलास डुकरे, सुनीता दौड, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक बि.आर.म्हस्के यांची उपस्थिती होती.