वैजापूर (औरंगाबाद) - औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली ( Aurangabad Crime News ) आहे. येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह जलदगती कालव्यात आढळून आला ( Sirajgaon youth Dead Body Found ) आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. योगेश नाथा कर्डीले ( वय 23, सिरजगांव ता. वैजापूर ) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, योगेश कर्डीले याचा सिरजगांव येथे मंडपाचा व्यवसाय आहे. शुक्रवारी घरी आईला मी मंडपाच्या कामानिमित्त बाहेर चाललो आहे म्हणून त्याने सांगितले. त्यानंतर योगेशचा मृतदेह महालगांव जवळ पाटाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. तर, त्याची मोटारसायकल आणि मोबाईल हनुमंतगांव येथे पाटाच्या कडेला सापडली आहे.